सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक

सोमवारी बीड बंदची हाक; क्लासेसच्या गेटला फासले काळे, आरोपींना अट करा, पालक आक्रमक

Beed Crime : बीडमध्ये दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत. (Beed) आता अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाब पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे. सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे.

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला.

धक्कादायक; बीडमधील खाजगी क्लासेसच्या दोन शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण

पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं या दोन शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघे जण खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलंच आक्रमक झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube