American airlines collided with a military helicopter : अमेरिकेतील व्हाईट हाउसजवळ एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले. या विमानात 60 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात एका हेलिकॉप्टला विमानाची धडक होऊन झाला. या विमानाला वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रिगन विमानतळावर उतरायचं होतं. विमान कंसास शहारतून वॉशिंग्टनला येत होते. या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
Explainer : विमान अपघाताच्या घटना का वाढल्यात? कारणं अन् उपाय दोन्ही बाजू समजून घ्याच!
BREAKING: Video shows 2 aircraft colliding over the Potomac River in Washington, D.C. pic.twitter.com/vVcyThS8Lr
— BNO News (@BNONews) January 30, 2025
या विमानांचे अवशेष सध्या पोटोमॅक नदीत आहेत. यंत्रणांनी मदत कार्याला सुरुवात केली आहे. ज्या हेलिकॉप्टरला या विमानाची धडक झाली ते हेलिकॉप्टर अमेरिकी सैन्याचे होते. या अपघातानंतर विमानतळावर आणीबाणी घोषित करून विमानतळ बंद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं व्हाइट हाउस आणि विमानतळ यांच्यातील हवाई अंतर तीन किलोमीटर पेक्षाही कमी आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमध्येच होते. त्यामुळे खरंच हा अपघात आहे की एखादं षडयंत्र आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. मिलिट्री हेलिकॉप्टरच्या अचानक येण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोटोमॅक नदीतील पाणी बर्फ झालेलं आहे. त्यामुळे यातील एकही प्रवासी जिवंत राहिल याची शक्यता खूप कमी आहे.
BREAKING: At least 19 bodies pulled from river after D.C. plane crash, according to first responders. No sign of survivors
— BNO News (@BNONews) January 30, 2025
विमानतळावर प्रवासी विमान उतरण्याआधीच हा अपघात झाला. सैन्याचे हेलिकॉप्टर आणि विमानाच्या धडकेने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सैन्याचे हेलिकॉप्टर या ठिकाणी अचानक येण्याचं कारण काय, या हेलिकॉप्टरमध्ये कोण होते या प्रश्नांचा अजून उलगडा झालेला नाही. त्यामुळे या घटनेचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवासी विमान विमानतळावर उतरण्याची तयारी करत असतानाच मागील बाजूने येणाऱ्या सैन्याच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची धडक या विमानाला बसली. धडक इतका जोरदार होती विमान आणि हेलिकॉप्टर कोसळून नदीत पडले. विमान लहान आकाराचे होते. यात 65 प्रवासी बसतील अशी व्यवस्था होती. या विमानात 60 प्रवासी होते. या विमानातील सर्वच प्रवासी मृत्यूमुखी पडले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 19 मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे.