people have no food but government and army busy Attack on India UN report reveals shocking reality Pakistan : पहलगाम हल्ला असो किंवा त्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर देणं असो. पाकिस्तानकडून कितीही बढाया मारल्या जात असल्या तरी देखील पाकिस्तानमध्ये कोट्यावधी लोकांची अन्न-अन्न दशा झालेली आहे. तसेच त्यांच्यावर प्रचंड कर्जाचा बोजा आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो किंवा चीन कडून पाकने मोठ्या प्रमामात कर्ज घेतलेले आहे. त्यावरच देशाची भिस्त असताना पाकिस्तानचं सरकार अन् लष्कर मात्र भारताशी युद्धाची भाषा करत आहे. देशातील जनता अन्नासाठी दाही दिशा फिरत आहेत. पाकिस्तानच्या या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
चीनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी घेतली शपथ
संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या गंभीर परिस्थितीबद्दल स्पष्ट सांगण्यात आलं आहे. देशात 11 मिलियन (1.1 कोटी) पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भूकबळीच्या मार्गावर आहेत.त्यामुळे पाकिस्तानकडे स्वत: च्या देशातील नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे भारत मात्र जगाला अन्न पुरवठा करत आहे. असं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
नवी धक्कादायक माहिती आली समोर; ज्योतीच्या टार्गेटवर होतं ‘हे’ प्रसिद्ध मंदीर?
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून 16 मे ला जारी करण्यात आलेल्या फूड क्रायसेसवर 2025 चा जागतिक रिपोर्टवरून कळतयं की, पाकिस्तानच्या बलूचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वा या राज्यांमध्ये 68 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 1.1 कोटी नागरिक गंभीर अन्न टंचाईचा सामना करत आहेत. 2024 च्या तुलनेत यावर्षीचा हा आकडा कमी होण्याऐवजी 38 टक्क्यांनी वाढला आहे.
एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, माजी आमदार रवींद्र धंगेकर पुणे महानगरप्रमुख
पाकिस्तानमधील या संकटाचा मोठं कारण आहे ते म्हणजे हवामान बदल. त्यात सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भाग गरिबीच्या खाईत लोटला गेला आहे. कुपोषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. 2018 पासून ते 2024 च्या सुरुवातीपर्यंत जागतिक कुपोषण दर 30 टक्के पेक्षा जास्त आहे. हा दर दहा टक्क्याने वाढणे देखील आरोग्य आणीबाणी मानली जाते त्यामुळे पाकिस्तानची स्थिती अत्यंत धोकादायक आहे.
भारतीय लष्करानं धूळ चारल्यानंतरही असीम मुनीर यांना सर्वोच्च लष्करी पदावर बढती, बनले फील्ड मार्शल
या कुपोषित वर्गामध्ये सर्वात जास्त लहान मुलं प्रभावित झाले आहेत. 2023 च्या मार्चपासून 2024 जानेवारीपर्यंत 6 ते 59 महिने या वयोगटातील जवळपास 21 लाख लहान मुलं गंभीर कुपोषणाच्या समस्यांनी पीडित आहेत. त्यानंतर 2025 साठी देखील अन्न आणि कृषी संघटनेने पाकिस्तानसाठी गंभीर इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील आरोग्य समस्यांना कारणीभूत असलेली दळणवळण सेवा अत्यंत खराब अवस्थेत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर त्यामुळेच सिंध, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान या राज्यांमध्ये संकट आणखी भयावह होत चाललं आहे.
‘त्या’ प्रकरणात कारवाई करा, नाना पटोले यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
त्यामुळे अन्न आणि कृषी संघटनेने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे की, तात्काळ हस्तक्षेप केला नाही. तर हवामान बदल आणि अन्न असुरक्षेमुळे पाकिस्तानवर आणखी मोठं संकट ओढाऊ शकतं.दुसरीकडे सरकारने इतर देशांकडून घेतलेलं कर्ज हे देशातील जनतेसाठी वापरण्याऐवजी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जात आहे भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पैलवान या ठिकाणी झालेला दहशतवादी हल्ला.
>देशात पुन्हा कोरोना, 2 जणांचा मृत्यू अन् 257 रुग्ण; जाणून घ्या ताजे अपडेट
पाकिस्तानवरील कर्जाबाबत बोलायचं झालं तर पाकिस्तानवर बाहेरील देशांचे कर्ज आता तब्बल 131 अरब डॉलरवर पोहोचलं आहे. जे त्यांच्या जीडीपीच्या 42 टक्के आहे सर्वात जास्त कर्ज हे चीनकडून घेण्यात आलं आहे. एवढंच नाही. पाकिस्तानचं परकीय चलन साठा(Pakistan Forex Reserve) फक्त 15 अरब डॉलरच्या आसपास आहे. ही केवळ तीन महिने आया करण्यासाठी वापरली जाऊ शकते. पाकिस्तान 2024 च्या जागतिक भूक इंडेक्समध्ये 127 पैकी 109व्या स्थानावर असल्याने सर्व देशांकडून अर्थिक मदत घेऊन देखील ही स्थिती सुधारली नाही. त्यामुळे आताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेल्या कर्जामुळे देखील पाकीस्तानची ही स्थिती सुधारेल असं नाही.