Download App

देशात पुन्हा कोरोना, 2 जणांचा मृत्यू अन् 257 रुग्ण; जाणून घ्या ताजे अपडेट

Corona Cases in India : देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना रुग्ण वाढत

Corona Cases in India : देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याने याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) देखील दिसून येत आहे. मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. ज्यामुळे अनेक गुंणतवणूकदारांचे पैसे बुडाले आहे.

देशात केरळ (Kerala) , महाराष्ट्र (Maharashtra) आणि तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्याकाही दिवसांपासून केरळ आणि तमिळनाडूमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 69 रुग्ण आढळून आले आहे तर तमिळनाडूमध्ये 34 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 44 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहे.

तर देशाची राजधानी दिल्लीसह कर्नाटक, गुजरातमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. माहितीनुसार, दिल्लीत सध्या करोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहे तर कर्नाटकामध्ये 8 आणि गुजरातमध्ये 6 रुग्ण आढळून आले आणि हरियाणा, राजस्थान, सिक्कीममध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आढळून आले आहे. भारतात सध्या कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आहे आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर दुसरीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना झपाट्याने वाढत असल्याने जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

UPI पेमेंट करणाऱ्यांची होणार मजा, 100 रुपयांच्या वस्तू फक्त 98 रुपयांमध्ये; जाणून घ्या कसं?

सिंगापूरमध्ये 14,000 रुग्ण

सिंगापूरमध्ये मे महिन्यात तब्बल कोरोनाचे 14, 000 रुग्ण आढळून आले आहे. याची दखल घेत भारतीय आरोग्य मंत्रालयाने आढावा बैठक घेतली आहे. बैठकीनंतर असे सांगण्यात आले की, सध्या भारतात कोरोना साथीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. तसेच देशात आढणारी प्रकरणे खूपच सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

follow us