Download App

भारतीय लष्करानं धूळ चारल्यानंतरही असीम मुनीर यांना सर्वोच्च लष्करी पदावर बढती, बनले फील्ड मार्शल

मुनीर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दोन गुप्तचर संस्थांचा प्रमुख होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर

General Asim Munir Promoted : पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. (Munir) पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुनीर यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संघीय मंत्रिमंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे सतत भारताविरुद्ध काही-बाही बरळत असतात. अलिकडच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी अनेक प्रक्षोभक विधाने केली होती. भारताविरुद्ध गरळ ओकल्याबद्दल मुनीरला पाकिस्तान सरकारने ही भेट दिली आहे अस सध्या बोललं जात आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये १ जुलैला पहिली बैठक; वाचा, नक्की कशावर होणार चर्चा?

मुनीर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दोन गुप्तचर संस्थांचा प्रमुख होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामाजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागील सूत्रधार असीम मुनीर हे असल्याचं बोलंलं जातं. भारताबद्दल द्वेष बाळगणारा अधिकाऱ्याने दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्करी गुप्तचर संस्था या दोन्हींचं नेतृत्व केलं आहे.

लेफ्टनंट जनरल मुनीर कोण आहेत?

लेफ्टनंट जनरल मुनीर हे पाकिस्तानमध्ये एक अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल मुनीर यांनी मंगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल प्रोग्रामद्वारे लष्करी सेवेत प्रवेश केला आणि फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. जनरल बाजवा यांनी तत्कालीन कमांडर एक्स कॉर्प्स असलेल्या निवृत्त लष्करप्रमुखांच्या अंतर्गत ब्रिगेडियर म्हणून फोर्स कमांड नॉर्दर्न एरियाजमध्ये सैन्याचे नेतृत्व केल्यापासून ते त्यांचे जवळचे सहकारी आहेत.

follow us