खुशखबर! सोनप्रयाग ते केदारनाथ केवळ 36 मिनिटांत, मोदी मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय

खुशखबर! सोनप्रयाग ते केदारनाथ केवळ 36 मिनिटांत, मोदी मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi Cabinet Approves Kedarnath Ropeway : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या मंत्रिमंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी उत्तराखंडला एक मोठी भेट दिलीय. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम-पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (Kedarnath Ropeway) पर्यंतच्या 12.9 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याची एकूण किंमत 4,081.28 कोटी रुपये असल्याची माहिती मिळतेय. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सध्या 8 ते 9 तासांचा असलेला प्रवास 36 मिनिटांमध्ये होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्वतमाला प्रकल्पांतर्गत गोविंदघाट ते उत्तराखंडमधील हेमकुंड साहिबपर्यंत 12.4 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासालाही मान्यता दिली आहे. पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात (PM Modi News) आली आहे, ज्यामध्ये पशु औषध घटकाचा समावेश आहे. लसीकरण, देखरेख आणि आरोग्य सुविधांच्या उन्नतीद्वारे पशुधन रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यास मदत करण्यासाठी ही योजना आहे.

क्लासिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘नमस्ते लंडन’ पुन्हा प्रक्षेकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार रिलीज

सोनप्रयाग ते केदारनाथ रोपवे प्रकल्प

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, रोपवे सार्वजनिक-खाजगी भागीदारीत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला (3S) तंत्रज्ञानावर विकसित केले जाईल. त्याच्या बांधकामानंतर, दररोज 18 हजार प्रवासी प्रवास करू शकतील. केदारनाथला (Kedarnath) येणाऱ्या यात्रेकरूंसाठी रोपवे प्रकल्प एक वरदान ठरेल. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असेल तसेच आरामदायी आणि जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे बराच वेळ वाचेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती

सोनप्रयाग ते केदारनाथ या 12.9 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्याचा एकूण खर्च 4, 081.28 कोटी रुपये असेल. त्याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की, सध्या 8-9 तासांत पूर्ण होणारा प्रवास 36 मिनिटांपर्यंत कमी होईल. यासोबतच, मंत्रिमंडळाने पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम (LHDCP) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. एलएचडीसीपी योजनेत पशुवैद्यकीय औषधांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 2024-25 आणि 2025-26 मध्ये 3,880 कोटी रुपये खर्च केले जातील.

गोविंदघाट ते हेमकुंड साहिबपर्यंत रोपवे
गोविंदघाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, हा प्रकल्प डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर) मोडवर तयार केला जाईल. त्याची एकूण किंमत 2,730.13 कोटी रुपये असेल. यामुळे हेमकुंड साहिबला येणाऱ्या यात्रेकरूंना आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळेल. ही योजना गोविंदघाट आणि हेमकुंड साहिब दरम्यान सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube