PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान मोदींचा माफीनामा

PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान मोदींचा माफीनामा

PM Modi : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोळल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. सध्या या प्रकरणात राज्य सरकारकडून चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या दुर्देवी घटनेनंतर जनतेशी माफी मागितली आहे.

तर आज (30 ऑगस्ट) वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील राज्यातील जनतेशी माफी मागितली आहे. मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो आणि शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी माफी मागितली आहे. ते आज पालघरच्या सिडको मैदानात वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्यासाठी शिवाजी महाराज फक्त महाराज नाही, राजपुरुष नाही, आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, आमचे संस्कार वेगळे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काही लोक आज वीर सावरकरांना शिव्या देतात. त्यांना अपमानित करतात मात्र असे लोक आम्ही नाही. सावरकरांचा अपमान करून देखील माफी मागत नाही, न्यायालयात जातात पण माफी मागत नाही अशी टीका देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली. तसेच शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोळल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

भाजपचा मोठा प्लॅन! विद्यमानांना मिळणार नारळ; ‘त्या’ सर्व्हेने उडालीय आमदारांची झोप

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. यातच आज वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube