‘मोहब्बत की दुकान खोलने से कूछ नही होता…,’ कॉंग्रेसच्या झिशान सिद्दीकींचा राहुल गांधींना घरचा आहेर
Zishan Siddiqui : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ही यात्रा वांद्रे पूर्व मतदारसंघात पोहोचली असता काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zishan Siddiqui) यांनी देखील या यात्रेत हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या वेळी बोलताना झिशान सिद्दीकी म्हणाले की, माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 हजारपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार असा विश्वास वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना झिशान सिद्दीकी म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये जेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा माझ्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत होते. तेव्हापासून मी त्यांचा आभारी आहे. आता देखील मतदारसंघात जे काम होत आहे ते यांच्या मदतीने होत आहे असेही यावेळी झिशान सिद्दीकी म्हणाले. तसेच मतदारसंघातील जनतेशी विचारून पुढील निर्णय घेणार असं देखील यावेळी ते म्हणाले. फक्त मोहब्बत की दुकान उघडून काहीही होत नाही मनात देखील प्रेम पाहिजे असा टोला देखील यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झिशान सिद्दीकीने लावला.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत बदल, आता ‘या’ महिलांना मिळणार 4500 रुपये
तर दुसरीकडे येत्या काही दिवसात झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने होत आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दीकी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मराठा आरक्षणासाठी फडणवीसांचा अडथळा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलं