नगर जिल्ह्यात अजित पवारांचा मास्टरस्टोक, रोहित पवारांची जागा धोक्यात?
Jay Pawar : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष सध्या निवडणुकीच्या तयारीला लागला असून कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची सध्या सर्व राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आज (18 ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी अचानक कर्जतला भेट दिली त्यामुळे अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांन विरूध्द फेल्डींग लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
जय पवार यांनी आज त्यांच्या कर्जत दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या तसेच गोदड महाराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे जय पवार रोहित पवार (Rohit Pawar) विरुद्ध कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
काही दिवसापूर्वी जय पवार बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र अचानक त्यांनी कर्जतला भेट दिल्याने जामखेड – कर्जत मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
आपला या दौऱ्यात जय पवार यांनी कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच काही कार्यकर्त्यांची भेट घेतली. मात्र आपण सहज कर्जतला आलो आणि कार्यकर्त्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं माध्यमांशी बोलताना जयंत पवार म्हणाले. तसेच जर कार्यकर्त्यांनी मला पुन्हा बोलवलं तर मी पुन्हा येईल असेही जय पवार म्हणाले.
त्यांच्या लेव्हला काय कंफ्युजन चाललं आहे : रोहित पवार
तर दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जय पवार यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, काही दिवसापूर्वी अजितदादा बोलत असतानाच काही कार्यकर्ते त्यांना भेटले आणि दादा तुम्ही आता थांबा जय पवारांना संधी द्या बोलून गेले, त्यावर जर कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल , असे दादा म्हणाले होते. मात्र दोन दिवसांनी जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले आहे.
‘आई-बापानं जन्माला घातलं म्हणून …’, अजित पवारांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर
त्यामुळे त्यांच्या लेव्हला काय कंफ्युजन चाललं आहे हेबघावं लागेल. अजितदादा तिथं उभं राहणार का नाही? जयची चर्चा तिथे सुरू झाल्यानंतर अचानक दोन दिवसांनी जय पवार कर्जत जामखेडमध्ये येत आहेत. अशी टीका रोहित पवार यांनी या दौऱ्यावरती केली.