‘आई-बापानं जन्माला घातलं म्हणून …’, अजित पवारांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

‘आई-बापानं जन्माला घातलं म्हणून …’, अजित पवारांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

Ajit Pawar On Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. आजही यात्रा आंबेगाव येथे पोहोचली. यावेळी सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देत उगाच आई बापांनी जन्माला घातले म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोला लावला आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका अजित पवारांवर केली होती. यावर उत्तर देत आंबेगाव येथे अजित पवार म्हणाले की, कोण आम्हाला शिव्या देत आहे तर कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय मात्र यामुळे राज्याचे प्रश्न सुटणार आहे का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, उगाच आई बापांनी जन्माला घातले म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला हे चालतं? आज जनता सुज्ञ आहे. असं अजित पवार म्हणाले.

लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल : अजित पवार

या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही काम करणारे माणसे आहे, बंद करणारे नाही. आम्ही योजना पुढे नेणारी माणसे आहे. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांना विचारा 1999 आणि 2004 चा काळ. निवडणुकीपूर्वी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला होता ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं मी म्हणालो, योजना पुढे चालू ठेव्याची तर त्यांनी आम्हाला सांगितले, निवडणूक झाली आपलं भागलं आता योजना बंद. असलं माझ्याकडून होणार नाही. हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. तसेच ही योजना बंद करायची की सुरु ठेवायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल जर तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर ही योजना सुरु रहाणार असं अजित पवार म्हणाले.

तर सभेत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, विरोधकांना काही काम नाही. ते आमच्यावर खोटे आरोप करत आहे. आमच्याकडून मागच्या वेळी काही गोष्टी चुकल्या ते आम्ही कबूल केल्या आहे. आता कांद्याला बरा भाव आहे. टोमॅटोला बरा भाव आहे. आता आम्ही त्यांना सांगितले आहे की, अजिबात कांदा निर्यात बंदी करायची नाही. त्यामुळे आता कांदा निर्यातबंदी होणार नाही. असेही यावेळी अजित पवार म्हणाले. जनतेचा सम्मान करण्यासाठी आम्ही जन सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे असं देखील यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

अजित पवार यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले होते की, सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झाले आहेत. सारडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सारडा बारामती सोडणार आहे पण कुठे जाणार आहे याची माहिती नाही असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच महाराष्ट्राला गुलाबी रंग धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे.

ठरलं! iPhone 16 ‘या’ दिवशी लाँच होणार, जाणून घ्या ॲपल इव्हेंटमध्ये आणखी काय असणार खास?

केसीआर यांचा देखील पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा राज्यात एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालले. भगवाचं तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे असं देखील संजय राऊत म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube