संजय राऊत दुतोंडी साप, त्यांचा बंदोबस्त…; गुलाबी सरडा टीकेवरून अजितदादा गट आक्रमक
Amol Mitkari On Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी अजित पवारांचा उल्लेख गुलाबी सरडा असा केला. राऊतांच्या टीकेला आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अमोल मिटकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारल असता ते म्हणाले की, ज्या व्यक्तीचा नरडाच सकाळपासून दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला वळवळत असेल त्याच्या नरड्यातून सरडा शब्द आला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. अजितदादांबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं असेल तर जबानीचा पट्टा चालणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापाने दुसऱ्याके तोंड दाखवण्यापेक्षा स्वतःच्या तोडाकडे पाहावं, असं त्यांनी म्हटलं.
लाडकी बहीण योजनेकडे व्यापारी पद्धतीने पाहू नका; नीलम गोऱ्हेंचे विरोधकांवर टीकास्त्र
पुढं ते म्हणाले, ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, पवार कुटुंब फोडलं त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भावा-बहिणीच्या नात्याबद्दल बोलताना स्वत:च्या अस्तित्वावर बोलावं. राऊतांसारखा घरभेदी एक दिवस उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणार हे नक्की. रंगावरून जर राऊत काही बोलत असतील तर पन्हाळ्याच्या खंडोबावर देखील गुलालाची उधळण होते. संजय राऊत निवडून आले तेव्हा गुलाल नक्की उधळला असेल. पौराणिक साहित्यात गुलाब, गुलाल आणि गुलाबी रंग फार पूजनीय मानला जातो. त्यामुळे एकीकडे हिंदू धर्माचा उर बडवायचा आणि दुसरीकडे हिंदू देव-देवतांची टिंगळ करायची असं करू नका, राऊत हे दुतोंडी सापासारखे बरळत असतात, अशी टीका मिटकरींनी केली.
राजकुमार हिरानी ते मोजेझ सिंग ‘या’ दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटाचा केला कायापालट
राऊतांशिवाय त्यांच्याकडे कुणी बोलणारं नाही. त्यामुळं राऊतांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा चालवला. जेव्हा आम्ही बोलायला लागू तेव्हा गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असता हे दाखवू, असंही मिटकरी म्हणाले.
राऊतांची टीका काय?
राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहीणीसाठी महाराष्ट्र लढला. बारामती लढली. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला. आता ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो? आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे, पण ते कुठं जाणार हे माहिती नाही. पण एक सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्रासाठी धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे, असं राऊत म्हणाले.
युगेंद्र पवार काय म्हणाले?
युगेंद्र पवार म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवले तर ते माझे काका आहेत. त्यामुळे सगळेचं जेव्हा त्यांच्यावर टीका करतात, तेव्हा प्रत्येकाची टीका आवडतेच असं नाही. राऊतांनी अशी टीका करणं योग्य नसल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.