खासदार अमोल कोल्हे- दिलीप वळसे पाटील यांची भेट; काय आहे नेमकं भेटीचे कारण?

खासदार अमोल कोल्हे- दिलीप वळसे पाटील यांची भेट; काय आहे नेमकं भेटीचे कारण?

Amol Kolhe Dilip Walse Patil Meeting : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यात भेट झाली आहे. मंचरमध्ये वळसे पाटील- अमोल कोल्हे यांची भेट झाली आहे. (Maharashtra Politics) या दोघांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, आज मंचर येथे सहकार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील साहेबांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना दीपावली पाडवा (Diwali Padwa) व बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! असे ट्विट त्यांनी यावेळी केले आहे. या भेटीचं नेमकं कारण काय? यावर चर्चा सुरु आहे.

यंदाची उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाडवा कसा असणार?

बारामतीतील गोविंद बागेत अजित पवारांच्या गटातील आमदारांनीही हजेरी लावली आहे. असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. त्यांनी काटेवाडीत धनी वस्तीला भेट दिली.

यंदाचा रोहित पवारांचा पाडवा कसा असणार?

मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली होती. या जाळपोळामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार याच कार्यालयात बीडवासियांसोबत दिवाळी-पाडवा साजरा करणार आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube