आयएएसचे खाजगीकरण हे आरक्षण संपवण्याची मोदींची गॅरंटी; UPSC च्या भरतीवरून राहुल गांधी कडाडले
Rahul Gandhi On Narendra Modi : केंद्र सरकारमध्ये (Central Govt) सहसचिव, उपसचिव आणि संचालक या पदांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची परीक्षा न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याद्वारे 45 पदांवर भरती केली जाणार आहे. यावर विरोधकांना आक्षेप घेतला. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील सरकारच्या या निर्णयामुळे चांगलचे संतप्त झाले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.
बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवा, त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा…; संभाजी भिडे आक्रमक
आयएएसचे खाजगीकरण हे आरक्षण संपवण्याची ‘मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.
नरेंद्र मोदी संघ लोक सेवा आयोग की जगह ‘राष्ट्रीय स्वयं सेवक संघ’ के ज़रिए लोकसेवकों की भर्ती कर संविधान पर हमला कर रहे हैं।
केंद्र सरकार के विभिन्न मंत्रालयों में महत्वपूर्ण पदों पर लेटरल एंट्री के ज़रिए भर्ती कर खुलेआम SC, ST और OBC वर्ग का आरक्षण छीना जा रहा है।
मैंने हमेशा…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 18, 2024
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातू मोठ्या सरकारी पदांची भरती करून नरेंद्र मोदी संविधानावर हल्ला करत आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाचीतल महत्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण खुलेआमपणे हिसकावले जात असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
आयटी अन् मॅकेनिकल इंजिनिअर, UPSC ही केली क्रॅक.. भारताचे क्रिकेटर्स शिक्षणातही अव्वल
पुढं राहुल गांधींनी लिहिलं की, मी नेहमीच म्हणत आलो की, वंचितांचे देशातील सर्वोच्च पदांवर प्रतिनिधित्व नाही. त्यात सुधारणा करण्याऐवजी लेटरल एन्ट्रीद्वारे वंचिताना उच्च पदांवरून दूर केले जात आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या होकरून तरूणांच्या हक्कांवर हा दरोडा असून, वंचितांसाठी आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मोठा धोका आहे. काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्वाच्या सरकारी पदांवर बसून काय करू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे SEBI. खाजगी क्षेत्रातन आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदाचा अध्यक्ष केलं गेलं.
प्रशासकीय संरचना आणि सामाजिक न्याय या दोन्ही गोष्टींना धक्का लावणाऱ्या, खीळ घालणाऱ्या देशविरोधी पावलाचा इंडिया आघाडी कडाडून विरोध करेल. आयएएसचे खाजगीकरण हे आरक्षण संपवण्याची ‘मोदींची गॅरंटी आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.