केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची संधी, असिस्टंट कमांडंट पदाच्या 506 जागांसाठी भरती सुरू

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची संधी, असिस्टंट कमांडंट पदाच्या 506 जागांसाठी भरती सुरू

UPSC CAPF Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्य (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगकडू (Central Public Service Commission) केंद्रीय सशस्त्र पोलीस (Central Armed Police) दलात असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत सुमारे ५०६ रिक्त पदे भरली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतासाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतं? याच विषयी जाणून घेऊ.

Aamir Khan: आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कोणी दिला? अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा! 

ही भरती असिस्टंट कमांडंट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्ससाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट कमांडंटची पदे भरली जाणार आहेत. upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे

महंत म्हणवणार महेश्वरानंद निघाला खुनी, मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार 

एकूण पदे – 506

पदांचा तपशील-
सीमा सुरक्षा दल (BSF): 186 पदे
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF): 120 पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF): 100 पदे
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP): 58 पदे
सशस्त्र सीमा बल (SSB): 42 पदे

शैक्षणिक पात्रता:
अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात परिक्षेला बसलेले असावेत.

वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट घालण्यात आली आहे. 01 ऑगस्ट 2024 रोजी उमदेवारांचे वय हे 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
SC/ST- 05 वर्षांची सूट
OBC – 03 वर्षे सूट

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

अर्जासोबत भरावे लागणारे शुल्क:
सामान्य/ओबीसी – रु 200
SC, ST, महिला – कोणतेही शुल्क नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

लेखी परीक्षा: 04 ऑगस्ट 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी लिंक-
https://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
UPSC CAPF 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
UPSC CAPF 2024

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

प्रथमच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://upsconline.nic.in/ या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करून वन-टाइम नोंदणी (OTR) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ओटीआर पूर्ण केल्यानंतर ते अर्ज प्रक्रिया सुरू करू शकता येईल.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी UPSC CAPF किंवा आयोगाने घेतलेल्या इतर कोणत्याही परीक्षेसाठी OTR पूर्ण केले आहे त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

पात्र उमेदवारांनी अर्ज करताना 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी कागदपत्रे जोडावीत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube