राजकीय नेत्यांना भुरळ पाडणारा महंतच निघाला खुनी, मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार
आपल्याच एका शिष्याच्या खुनाच्या गुन्ह्यात बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) खुनी ठरला आहे. सध्या तो फरार आहे.

अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur)शहरांमध्ये गेल्या नवरात्र उत्सवाला छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या एका महंतांची चांगली चर्चा राज्यभर रंगली होती. विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी या महंताचे दर्शन घेण्यासाठी रांगा देखील लावल्या होत्या. मात्र स्वतःला महंत म्हणून घेणारा हा ढोंगी आपल्याच एका शिष्याच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ठरला आहे. सध्या तो फरार झाला आहे. बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) असं या महंताचे नाव आहे. महेश अर्जुन माने हे मूळ नाव आहे.
रणजितसिंहांचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार; धैर्यशील मोहितेंच्या बंडाने फडणवीस नाराज
श्रीरामपूर येथे गेल्या वर्षी छातीवरती घटस्थापन करणाऱ्या या बाबाचे शहरभर फ्लेक्स लागले होते. नवरात्रोत्सव काळामध्ये बाबाने तब्बल महिनाभर श्रीरामपूरमध्ये वास्तव्य देखील केले. नेते लोकप्रतिनिधी बाबांच्या चरणी लीन झाले होते. मात्र महंत म्हणून घेणाऱ्या या बाबावर एका खुनाचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळं या ढोंगी बाबाचा खरा चेहरा हा उघड झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या 34 वर्षीय वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या महाराजांच्या कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत वैष्णवीचा एका तरुणाशी विवाह जुळवण्यामध्ये या बाबाचा पुढाकार होता. मात्र लग्नापूर्वी वैष्णवी व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्याला वैष्णवीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वैष्णवीने धरलेला हट्ट सोडावा यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला महंताकडे नेले. मात्र तरीदेखील मुलीने नकार दिल्याने तिला मठांमध्येच मारहाण करण्यात आली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरूनच मारहाण केल्याचा आरोप आहे.
BMCM ची’ जादू ओसरली! 18 व्या दिवशी केली केवळ इतकी कमाई, ‘मैदान’ची अवस्था तर आणखी बिकट
याच महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर महंतच या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी समोर आणले. गुन्हा दाखल होताच हा ढोंगी तेथून पसार झाला आहे. बाबा म्हणून डोक्यावरती बसवले ढोंगी हा एका मुलीचा खुनी निघाल्याचे बातमी समजतात श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी तसेच पुढारी या बाबाच्या चरणी लीन झाले आता त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.
दरम्यान, या बाबाचे पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचाच भाऊ बालकृष्ण महाराज यांच्यासह तो स्वतः या मठाचे काम पाहतो. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, सोलापूर पनवेल, सांगलीसह उस्मानाबादमध्ये याचा मोठा भक्त परिवार देखील आहे.