अबब! चक्क तेरा कोटींचे अमली पदार्थ जप्त…जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची घटना

Drugs worth Rs 13 crore seized in Shrirampur : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे (Narcotics) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, असे असले तरी पोलिसांकडून देखील याविरोधात जोरदार कारवाई करण्यात येत (Ahilyanagar Crime) आहे. यातच नगर जिल्ह्यात अमली पदार्थाबाबत एक मोठी कारवाई समोर आली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी तब्बल 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही (Crime News) कामगिरी करण्यात आली आहे.
भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर (Shrirampur) विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका छोटा हत्ती टेम्पोमधून अमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खात्री करून कारवाई करण्यास सांगितले. पोलीस पथकाने दिघी खंडाळा रोडवर सापळा रचून थांबले असताना एक क्रीम कलरचा टेम्पो पथकाला येताना दिसला.
पोलीस पथकाने तात्काळ त्या टेम्पोला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर आणि स्फटिक आढळले. या मुद्देमालाबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता त्यांनी सदरील माल हा विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांनी दिला असल्याचे सांगितले. याबाबत मिनीनाथ विष्णू राशिनकर रा. राहता जिल्हा अहिल्यानगर, विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे, यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत राजनाथ सिंहांचं मोठं विधान; पाकिस्तानची झोप उडणार
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोना.किशोर औताडे, सोमनाथ मुंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अकबर पठाण, आजिनाथ आंधळे, राहुल पोळ, रमेश रोकडे, झिने, राजेश सूर्यवंशी, बाळासाहेब गिरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अंमलदार नितीन चव्हाण, रवींद्र बोडखे, अमोल नागले, नितीन शिरसाट, दिलीप कुऱ्हाडे, अश्विनी पवार यांनी केली आहे.