आयटी अन् मॅकेनिकल इंजिनिअर, UPSC ही केली क्रॅक.. भारताचे क्रिकेटर्स शिक्षणातही अव्वल
Team India Cricketers : भारतीय क्रिकेट टीम क्रिकेट जगतात (Team India) अव्वल क्रमांकावर आहे. टीम इंडियाने नुकताच टी 20 वर्ल्डकप जिंकला (T20 World Cup) आहे. भारतीय संघात असे अनेक खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी संघाला नावारूपास आणण्यात मोठे योगदान दिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का यातील बरेच खेळाडू शिक्षणातही अव्वल होते. चला तर मग जाणून घेऊ या अशा काही उच्च शिक्षित खेळाडूंबद्दल..
अमेय खुरासिया (युपीएससी)
टीम इंडियाचा माजी खेळाडू अमेय खुरासियाने क्रिकेटप्रमाणेच शिक्षणातही मोठं नाव कमावलं आहे. त्याने देशातील सर्वात कठीण अशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सिव्हिल सेवा (UPSC) परीक्षा पास केली आहे. क्रिकेट सोडल्यानंतर आता अमेय खुरासिया भारतीय सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहे.
राहुल द्रविड (एमबीए)
भारतीय क्रिकेट संघाचा द वॉल म्हणून कधीकाळी ओळखला जात असलेल्या राहुल द्रविडने (Rahul Dravid) नुकताच हेड कोचपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल द्रविडने बंगळुरू (Bangaluru) येथील बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन महाविद्यालयामधून एमबीए केलं आहे.
T20 World Cup 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचा पहिला सामना कधी? जाणून घ्या..
अनिल कुंबळे (मेकॅनिकल इंजिनिअर)
भारताचा जादुई माजी लेग स्पिनर अनिल कुंबळेने (Anil Kumble) बंगळुरू येथील राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजनिअरिंग येथून मेकॅनिकल इंजिनिअर पदवी घेतली आहे.
जवागल श्रीनाथ (इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर)
टीम इंडियाच्या माजी वेगवान गोलंदजांतील एक यशस्वी नाव म्हणजे जवागल श्रीनाथ. कर्नाटकातील म्हैसूर (Karnataka) येथील श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. 90 च्या दशकात भारतीय संघात गोलंदाजांची कमतरता होती. या काळात जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद या दोघांनी ही कमतरता भरून काढली होती.
आर. आश्विन (आयटी इंजिनियर)
भारतीय संघातील सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू आर. आश्विन शिक्षणातही अव्वल आहे. रविचंद्रन अश्विनने चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून बीटेक (आयटी इंजिनियरिंग) केले आहे. सध्या अश्विन भारतीय संघात जास्त दिसत नाही. अनेकदा त्याला सामन्यात खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र अश्विनने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम केले आहेत.
IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात
आविष्कार साळवी (पोस्ट डॉक्टरेट इन एस्ट्रोफिजिक्स)
भारताचा ग्लेन मेकग्रा म्हणून ओळखला जाणारा आविष्कार साळवी याने एस्ट्रोफिजिक्स मध्ये पीएचडी केली आहे. अविष्कार साळवीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मात्र फार काळ खेळता आलं नाही. त्याने ज्यावेळी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्याची गोलंदाजी करण्याची पद्धत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रासारखीच होती. म्हणून अविष्कार साळवीला टीम इंडियाचा ग्लेन मॅकग्रा म्हणून ओळखलं जात होतं.