बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवा, त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा…; संभाजी भिडे आक्रमक

बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबवा, त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा…; संभाजी भिडे आक्रमक

Sambhaji Bhide : बांगलादेशातील (Bangladesh) हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेने 25 ऑगस्टला सांगलीत कडकडीत बंदची हाक दिली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी या बंदची हाक दिली आहे. या बंदसाठी 20 ऑगस्ट रोजी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी संभाजी भिडे यांनी महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्याचं आवाहनही भिडेंन केलं.

ठरलं! iPhone 16 ‘या’ दिवशी लाँच होणार, जाणून घ्या ॲपल इव्हेंटमध्ये आणखी काय असणार खास? 

सांगलीत कडकडीत बंद…
संभाजी भिडेंनी सांगलीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बांगलादेशातील हिंसाचारावर बोलतांना त म्हणाले, पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज भारताकडे आश्रयाला आल्या. दुसरीकडे कुठं गेल्या नाहीत. पंतप्रधान भारतात आल्यावर हिंदूंवर अत्याचार होताहेत, बांगलादेशात सुरू असलेले अत्याचार त्वरित थांबायला हवेत. भारतात याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, असं भिडे म्हणाले.

बांगलादेशातील नंगानाच तात्काळ थांबवा…
बांगलादेशातील नंगानाच तात्काळ थांबायला हवा, यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.
जसं बटन दाबल्यावर दिवा बंद होतो, तसं काम या समस्येबद्दल केलं पाहिजे, असं भिडे म्हणाले. बांगलादेशातील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतर नको, त्यांना बांगलादेशमध्येच सुरक्षा मिळायला हवी. सर्व हिंदू राजकारण्यांनी या गोष्टी घडल्यावर पेटून उठायला हवं, असं भिडे भिडे म्हणाले.

पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर भिडेंनी संताप व्यक्त केला. आपल्या देशात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यावर कठोर भूमिका घ्यावी, असे भिडे म्हणाले.

यावेळी बोलतांना भिडेंनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं. मात्र केवळ आर्थिक मदत किंवा मानधन देऊन चालणार नाही. आर्थिक मदतीबरोबरच महिलांच्या केसांना धक्का लागणार नाही, असं शासन अपेक्षित आहे, असं भिडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube