Mumbai Politics : झिशान सिद्दीकींची ठाकरे गटावर नाराजी; म्हणाले, ‘अनिल परबांनी घात…’

  • Written By: Published:
Mumbai Politics : झिशान सिद्दीकींची ठाकरे गटावर नाराजी; म्हणाले, ‘अनिल परबांनी घात…’

Zeeshan Siddiqui : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीक (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui ) यांचीही भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधान आलं. मात्र, या भेटीत अजितदादांनी कुठलीही ऑफर दिली नसून आपण कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचं झिशान यांनी स्पष्ट केलं.

प्रिया दत्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा सिद्दिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या विधानाने खळबळ 

झिशान सिद्दीकी यांनी लेट्सअपशी संवाद साधला. यावेळी त्यांना बाबा सिद्दीकींच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी विचारले असता झिशान यांनी सांगितले की, मुलगा होण्याच्या नात्याने माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. 48 वर्ष कॉंग्रेसमध्ये घातल्यानंतर त्यांना काही गोष्टी खटल्या. त्यामुळं त्यांना आपली वेगळी वाट निवडली. कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं झिशान यांनी सांगितलं.

Mumbai Local Train : लोकोपायलटच्या असहकारने 84 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप 

अजित पवारांनी झिशान यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीत येण्यचाी ऑफर दिली का? या प्रश्नावर बोलतांना झिशान म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझ्या कार्यालयात आले हे त्याचं मोठंपण आहे. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हेही होते. माझ्या मतदारसंघातील एका कार्यक्रमाला जातं असतांना त्यांनी ही भेट दिली. याआधी जेव्हा सरकारी कार्यक्रम माझ्या मतदारसंघात व्हायचे, तेव्हा मला मला निमंत्रणही नसायचं. मात्र, आज आम्ही विरोधक असूनही त्यांनी वेळ काढून कार्यालयाला भेट दिली. अजित दादांनी आपल्याला कुठलीही ऑफर दिली नाही. मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. माझा कॉंग्रेस सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचं झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं.

यावेळी बोलतांना झिशान यांनी ठाकरे गट आणि अनिल परब यांच्यावर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या काळात मी सत्ताधारी आमदार होतो. मात्र, माझ्या मतदारसंघाला निधी मिळायचा नाही. अनेक आमदारांना विकासनिधी मिळत असे. मात्र, माझा वांद्रे पश्चिम मतदारसंघाला कधी मिळेना. कॉंग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत सांगितलं, मात्र माझ्या बाजूने कोणी काहीही बोललं नाही. या मतदारसंघावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे, असं सांगितलं जायचं. अनिल परब तर लहानसहान गोष्टींवरूनही राजकारण करत, असं सिद्दीकी म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले की, अजित पवारांच्या कानावर जेव्हा ही गोष्टी गेली, तेव्हा त्यांनी आपल्या मतदारसंघाला निधी दिला, असं सिद्दीकी म्हणाले.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube