प्रिया दत्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा सिद्दिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजितदादांच्या विधानाने खळबळ
Ajit Pawar on Priya Dutt : काँग्रेस नेत्या प्रिया दत्त (Priya Dutt) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुनिल दत्त यांच्या मुलीशी चर्चा करुनच बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.
अजित पवार म्हणाले की ज्येष्ठ नेते आणि अभिनेते सुनिल दत्त यांनी अनेक धडाडीचे कार्यकर्ते तयार केले. बाबा सिद्दिकी यांच्यातील नेतृत्व गुण पाहूनच त्यांना वांद्रे भागातून पाठबळ दिले. आज देखील बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांच्या मुलीला विश्वास घेऊनच पुढील निर्णय घेतला.
दरम्यान सिद्दीकी म्हणाले की, आज मला खूप अस्वस्थ वाटतेय. कारण काँग्रेसचा कार्यक्रम नसलेल्या व्यासपीठावर मी प्रथमच प्रास्ताविक भाषण देत आहे. पण, आता नारेबाजी झाली तर एकच होईल ती म्हणजे अजितदादांची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची.
Mumbai Local Train : लोकोपायलटच्या असहकारने 84 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप
अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या निर्णयावर सिद्दीकी म्हणाले, कॉंग्रेस सोडण्याआधी मी प्रिया दत्तला फोन केला होता. त्यांना विचारलं होतं की, तुम्ही निवडणूक लढवणार का? कारण आपले रस्ते वेगळे होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, त्या निवडणूक लढवणार नाही. मग प्रफुल्ल पटेलांसोबत त्यांची घरी चर्चा झाली. त्यांनी अनेकदा विचारू करून निर्णय घ्या, असं सूचवलं. पण, मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादीत प्रवेश करायचाच. आणि त्याच दिवशी मी काँग्रेसच्या वरिष्ठांना कळवून कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असं सिद्दीकी यांनी सांगितले.
‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार
दरम्यान, 66 वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले होते. ते 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.
पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !