‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार

  • Written By: Published:
‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार

Baba Siddiqui : काही दिवसांपूर्वी मिलिद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. कॉंग्रेसमध्ये आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं, असं सिद्दीकी म्हणाले.

हे फर्मांन अजित पवारांच्या बोलण्यासारखे : राज ठाकरे यांची फटकेबाजी 

पक्ष प्रवेशावेळी भाषण करतांना सिद्दीकी म्हणाले, आज मला खूप अस्वस्थ वाटतेय. कारण काँग्रेसचा कार्यक्रम नसलेल्या व्यासपीठावर मी प्रथमच प्रास्ताविक भाषण देत आहे. पण, आता नारेबाजी झाली तर एकच होईल ती म्हणजे अजित दादांची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची, असं सिद्दीकी म्हणाले. अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या निर्णयावर सिद्दीकी म्हणाले, कॉंग्रेस सोडण्याआधी मी प्रिया दत्तला फोन केला होता. त्यांना विचारलं होतं की, तुम्ही निवडणूक लढवणार का? कारण आपले रस्ते वेगळे होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, त्या निवडणूक लढवणार नाही. मग प्रफुल्ल पटेलांसोबत त्यांची घरी चर्चा झाली. त्यांनी अनेकदा विचारू करून निर्णय घ्या, असं सूचवलं. पण, मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादीत प्रवेश करायचाच. आणि त्याच दिवशी मी काँग्रेसच्या वरिष्ठांना कळवून कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असं सिद्दीकी म्हणाले.

हमीभावापेक्षा कमी दर, शेतकऱ्याने कापूस पेटवला; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘हमीभाव मिळेल…’ 

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर टीकाही केली. क़ॉंग्रेसध्ये आम्हाला फक्त कडीपत्ता समजल्या जायचं, जो फक्त स्वाद वाढण्याचं काम करत असतो, अशी खंत सिद्दीकींनी बोलून दाखवली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, ६६ वर्षीय बाबा सिद्दीकी एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले होते. ते 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज