हे फर्मांन अजित पवारांच्या बोलण्यासारखे : राज ठाकरे यांची फटकेबाजी

  • Written By: Published:
Loksabha Election : मनसेचे इंजिन महायुतीला जोडणार ? राज ठाकरे तातडीने दिल्लीला

Raj Thackeray on Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकर (Raj Thackeray हे अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीदीची वीट घेऊन पुण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्यासोबतची वीटपुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द केली. यावेळी मंडळाकडे संग्रहित असलेले दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरेंनी अजित पवारांविषयी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच हसू आलं.

पुणे हादरले ! एकाला संपवून आरोपीची गोळ्या झाडून रिक्षामध्येच आत्महत्या 

खरंतर राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी नेत्यांबाबत केलेल्या मिश्किल विधानांमुळं चांगलाच हशा पिकतो.आजही भारत इतिहास संशोधक मंडळातील दुर्मिळ फर्मान पाहत असतां त्यांना अजित पवारांविषयी वक्तव्य केलं. त्याचं झालं असं की, राज ठाकरेंना संस्थेचे काही लोक दुर्मिळ फर्मानाविषयी माहिती देत होते. त्या फर्मानातील लिहिण्याची पद्धत पाहून राज ठाकरेंना अजित पवारांची आठवण झाली. फर्मानातील लिखान हे अजित पवार बोलतात त्याचप्रमाणणे आहे. कुठही स्वल्पविराम नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, अशी मिश्किल फटकेबाजी त्यांनी केली. त्याचं ही टिप्पणी ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पुण्याच्या तहसिलदारांना ज्येष्ठांचा अपमान भोवणार? बडतर्फीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

यावेळी राज ठाकरे यांनी भाषणही केलं. ते म्हणाले, भारतीय इतिहास संशोधन मंडळात येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. या ठिकाणी हजारो वर्षांचा इतिहास जपला गेला आहे, बाकीकडे फक्त भूगोल आहे. इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून म्हणून इतिहास घडत नाही. आपल्या रक्तात अजून महापुरूष शिरायचे आहेत, असं ते म्हणाले.

तेव्हा टेंडर निघत नव्हते
बाबरी मशीद पाडली तेव्हा आमचे नेते बाळा नांदगावकर तिथे उपस्थित होते, त्यांनी तिथून एक वीट आणली, ती वीट त्यांनी मला भेट दिली. ती वीट तुम्हीही बघा, आधीचे बांधकाम कसे होते ते पहा. हातोड्याचा वार झाला आणि मशीद पडली नाही. भक्कम बांधकाम होतं, तेव्हा टेंडर निघत नव्हते, असा टोलाही त्यांनी राज्यकर्त्यांना लगावला.

follow us