बीडमध्ये पडला दगडांचा पाऊस; गावकऱ्यांमध्ये दहशत, नेमकं घडतंय तरी काय?

Rocks Falling From Sky In Limgaon : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता बीडमध्ये दगडांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील लिमगाव येथे घडली आहे. बीडमधील गुन्हेगारी आणि दहशत (Beed Crime) हे काही राज्यातील जनतेला नवीन नाहीये. पण आता बीड जिल्ह्यात अवकाशातून दगड पडत असल्याचं समोर (Rocks Falling From Sky) आलंय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी काय आहे, ते आपण सविस्तर पाहू या.
वाल्मिक कराडने सगळे पापं मुंडेंसाठी केले, त्यांची आमदारकीही रद्द करा, जरांगेंची मागणी
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून अडीचशे ग्रॅम वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडला. त्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो दगड थेट घरात आल्याचं दिसून आलंय. तर दुसरा दगड शेजारील गायरानात आढळून आलाय. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही दगड अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
आकाशातून अचानक दगड पडले तेव्हा मोठा आवाज झाला होता. हे दगड तहसील प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. छत्रपती संभाजी नगर येथील भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केलीय. काल दुपारी ही घटना घडली. जेव्हा दगड आकाशातून खाली पडले, तेव्हा दोन ते चार दगड पडल्याचं गावकरी सांगत आहेत. आता या दगडांमध्ये नेमकं कोणतं गूढ दडलंय, ते संशोधकच स्पष्ट करतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
हे दगड अतिशय प्रचंड वेगात खाली आले होते. त्यांच्यामुळे घरावरील पत्राच तुटल्याचं दिसत आहे. तर शेतात पडलेला आणि घरावर पडलेला दगड वेगळा असल्याचं देखील गावकरी सांगत आहेत. जेव्हा हा दगड घरावर पडला होता, तेव्हा तो प्रचंड गार होता असं देखील गावकरी सांगत आहेत. बीडमध्ये अगोदर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेलं आहे.