स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच…नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती

Congress state president On local body elections : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (local body elections) वेध लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनिती आखत आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी (Harshvardhan Sapkal) देखील त्यांची रणनीती आखली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस (Congress) स्वबळावरच लढवणार असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली (Maharashtra Politics) आहे. हे निरीक्षक प्रत्येक प्रभागात, वार्डात जावून आघाडी करायची का? स्वबळावर निवडणूक लढवायची? याबाबतची विचारणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकारी यांना करत असल्याचं समोर आलं आहे.

Video : अखेर नामदेव शास्त्री महाराजांना उपरती झाली; म्हणाले, देशमुख कुटुंब भेटल्यानंतर मला…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन या सर्व निरीक्षकांना एक अहवाल तयार करायचा आहे. तो अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे जाणार आहे. या अहवालानुसार प्रदेशाध्यक्ष काँग्रेस हायकामांशी चर्चा करून मग स्वबळाबाबत निर्णय घेणार आहेत. सद्य परिस्थितीला बहुतांश प्रभागातून स्वबळावरच निवडणुका लढाव्यात, असा स्वर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून येत असल्याचं सांगितलं जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षांसोबत आघाडी करायची का? नाही याबाबतची विचारणा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागात जाऊन करणार आहे. याबाबतची जबाबदारी पक्षाने निरीक्षकांना दिली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

Video : अखेर नामदेव शास्त्री महाराजांना उपरती झाली; म्हणाले, देशमुख कुटुंब भेटल्यानंतर मला…

निरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणची राजकीय समीकरणे, सामाजिक समीकरणे काय आहेत. त्याठिकाणी सक्षम उमेदवार किती आणि कोण आहेत? याची पाहणी कारायची आहे. तसेच त्या भागातील आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक इतर कमिटांच्या सभासदांची चर्चा करून त्या प्रभागामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणं योग्य राहील की स्वबळावर निवडणूक लढवावी? याबाबतचा अभिप्राय द्यायचा आहे. हा अभिप्राय प्रदेश पातळीवर पाठवण्यात येणार असून त्यावरती प्रदेश पातळीवरून निर्णय घेण्यात येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube