स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तारीख पे तारीख! उन्हाळ्यातही निवडणुका नाहीच

Local body elections hearing postponed No elections in summer : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्येच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी देखील काही मिनिटे चालली. त्यानंतर ती स्थगित झाली. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना जुनी हवी की नवी यावर 23 याचिकाकर्त्यांनी सरकार पक्षाचे एकमत न झाल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा पुढची तारीख मिळाली आहे.
महिला दिनाचं लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट; सरकारकडून मोठी घोषणा, योजनेचे 2 हप्ते…
त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उन्हाळ्यात होण्याची शक्यता देखील मावळली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीची मोठी तयारी केलेल्या उमेदवारांसाठी निराशा पदरी आली आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात जर निवडणूक झाल्या नाही तर ही निवडणूक थेट दिवाळी नंतर होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली 15 किलो सोन्याची तस्करी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
दुसरीकडे विधानसभेला ऐतिहासिक यश मिळवल्याने महायुती आणि त्यातही भाजपा या निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली होती. विधानसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल अशी आशा महायुती आणि विशेषतः भाजपला आहे. त्यामुळे पक्ष सदस्य नोंदणी, जोमाने कामाला लागलेले कार्यकर्ते असा सगळा फौज फाटा सर्वच पक्षांना कधीपर्यंत तैनात ठेवावा लागणार आहे. हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.