Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला

फ्लाय दुबई एअरलाईन्स विमानात वैमानिकांच्या वादात पडून झटापट करणाऱ्या एका इस्रायली नागरिकाने घटनेचा थरार सांगितला आहे.

Untitle (2)

Untitle (2)

Flydubai Flight : दुबईहून इस्त्राइलला निघालेल्या फ्लाय दुबई एअरलाईनच्या विमानात दोन वैमानिकांमध्ये (Flydubai Flight) वाद झाल्याच्या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली. या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका इस्रायली नागरिकाने घटनाक्रम सांगितलीयं. यानिव ह्यून असं या इस्रायली नागरिकाचे नाव असून त्याने कॉकपिटमध्ये शिरुन वाद घालणाऱ्या सहवैमानिकाशी झटापट केली, आणि विमान अपहरणाचा डाव हाणून पाडला आहे.

ह्यून यांनी विमानात घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. ह्यून यांना आधीचा सुरक्षेचा कोणताही अनुभव नसताना विमानात वैमानिकांमध्ये वाद सुरु असल्याचं लक्षात घेत थेट कॉकपिटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ह्यून यांनी चाकू हल्ला करणाऱ्या वैमानिकाशी झटापट करत वैमानिकाचा चाकू हल्ला हाणून पाडला आहे. यावेळी सह-वैमानिक विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करीत होता. याचवेळी ह्यून यांनी सह-वैमानिकाचा गळा दाबून त्याला कॉकपिटमधून बाहेर ओढलं. त्यानंतर इतरही नागरिक मदतीला आले.

ह्यून आणि सह-वैमानिकांमध्ये झटापटी सुरु असतानाच दोन मिनिटांत विमान जवळपास 17 हजार फूटांपेक्षा अधिक खाली आले होते. याचदम्यान त्यांनी पुन्हा कॉकपिटमध्ये प्रवेश करीत विमानावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉकपिटमध्ये ह्यून विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच एक सुट्टीवर असलेला वैमानिक कॉकपिटमध्ये आला आणि त्याने नियंत्रण आपल्या हाती घेत विमानाचं सुरक्षित लॅंडिग केले.

नेमकं काय घडलं होतं?
फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळाकडे जात होते. विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये वाद झाला. सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही मच्छार यांनी विमानाचा ताबा घेतला आणि सुरक्षितपणे विमान उतरवले.

Exit mobile version