Japan Airlines jet Catches Fire On Airport : जपानमधील टोकियो येथील हानेडा विमानतळावर लँडिंग करताना दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला. जपान एअरलाइन्सच्या विमानाची तटरक्षक दलाच्या विमानाशी टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत तट रक्षक दलाच्या विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, विमानाचा मुख्य कॅप्टन गंभीर जखमी झाला आहे.
BREAKING: 5 Coast Guard members killed, captain seriously injured in plane crash at Tokyo Airport – NHK
— BNO News (@BNONews) January 2, 2024
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्वरीत विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली असून, जपान एअर लाईन्समधील सर्व 379 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या घटनेत तटरक्षक दलाच्या विमानातील 6 क्रू मेंबर्स बेपत्ता होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, विमानाचे मुख्य कॅप्टन गंभीर जखमी झाला आहे.
Chitra Wagh : ‘कोंबड्यांच्या कलकलाटाला ताकद म्हणत नाही’; चित्रा वाघांचा राऊतांना खोचक टोला
प्रकाशित वृत्तांनुसार, आग लागलेल्या JAL 516 फ्लाईटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. ज्यावेळी विमानाने रनवेवर लँडिंग केले त्यावेळी जपान एअर लाईन्सच्या विमानाची आणि तटरक्षक दलाच्या विमानाची टक्कर झाली. त्यानंतर JAL 516 विमानाने पेट घेतल्याने प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर काढण्यात आले. या घटनेत जपान एअर लाईन्समधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.
#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo’s Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters
(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9
— ANI (@ANI) January 2, 2024
शिन चिटोस विमानतळावरून केले होते उड्डाण
जपानमधील शिन चिटोस विमानतळावरून JAL 516 विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर हे विमान हानेदा येथे पोहोचले होते. लँडिंग करत असताना संबंधित विमानाची तटरक्षक दलाच्या विमानाशी टक्कर झाली. त्यानंतर लगेच JAL 516 आणि तटरक्षक दलाच्या विमानाने पेट घेतला. घटनेवेळी जपान एअरलाइन्स फ्लाइट 516 मध्ये 379 प्रवासी होते. तर, कोस्ट गार्डच्या विमानात 6 जण होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून, विमानाचे मुख्य कॅप्टन गंभीर जखमी झाला आहे.
BREAKING: 5 crew members of Coast Guard plane unaccounted for after collision at Tokyo Airport, captain survived – NHK
— BNO News (@BNONews) January 2, 2024
1985 मध्ये झाला होता भीषण अपघात
आजच्या घटनेपूर्वी जपामध्ये 1985 साली भीषण विमान अपघात झाला होता. टोकियो ते ओसाकाला उड्डाण करणारे JAL जंबो जेट मध्य गुन्मा प्रदेशात क्रॅश झाले होते. या भीषण अपघातात 520 प्रवासी आणि सर्व क्रू मेंबर्सचा मृत्य़ू झाला होता.