मोठी बातमी! जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला, विमानसेवा विस्कळीत; प्रवासी ताटकळले

मोठी बातमी! जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला, विमानसेवा विस्कळीत; प्रवासी ताटकळले

Japan Airlines Cyber Attack : जपानमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जपान एअरलाइन्सवर  (Japan Airlines) आज सकाळी एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून कंपनीची अंतर्गत आणि बाह्य यंत्रणा ठप्प झाली आहे. हा हल्ला गुरुवारी सकाळी 7.24 वाजता झाला. JAL कंपनीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली आहे. आमच्या अंतर्गत आणि बाह्य नेटवर्क डिव्हाईसवर सायबर हल्ल्यामुळे अडचणी येत आहेत. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामुळे विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत का याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही. परंतु, विमानतळावर तिकीट विक्री मात्र थांबवण्यात आली आहे.

Japan Earthquake: भूकंपात अडकलेल्या भारतीय अभिनेत्याची तब्बल 18 तासांनी सुटका

जपान एअरलाइन्स देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. सायबर हल्ला होणाऱ्या कंपन्यांच्या यादीत आता या कंपनीचाही समावेश झाला आहे. 2022 मध्ये टोयोटाच्या एका पुरवठादारावर असाच सायबर हल्ला झाला होता. यामुळे कंपनीला देशातील प्रकल्पांतील उत्पादन थांबवावे लागले होते. याआधी जून महिन्यात जपानमधील लोकप्रिय व्हिडिओ शेरयिंग साइट निकोनिकोवरही सायबर हल्ला झाला होता. परिणामी कंपनीला आपली सेवा काही काळ थांबवावी लागली होती.

सायबर हल्ले फक्त जपानमध्येच होत आहेत असे नाही. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतली सिएटल टकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सायबर हल्ला झाला होता. यामुळे येथील इंटरनेट आणि वेब सिस्टीम ठप्प पडल्या होत्या. यामुळे विमान उड्डाणांत विस्कळीतपणा आला होता. आता या वर्षाच्या अखेरीस जपान एअरलाइन्सवर असाच हल्ला झाला आहे. त्यामुळे जपानी कंपन्यांची सायबर सुरक्षा कशी आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोठी बातमी : जपानी संस्था निहोन हिडांक्योला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube