Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात! 14 प्रवाशांच्या मृत्यूने खळबळ

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शनिवारी रात्री एका खासगी विमानाचा भीषण अपघात  (Brazil Plane Crash) झाला. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात बारसेलोस प्रांतात झाला. राजधानी मनाऊपासून हे ठिकाण 400 किलोमीटरवर आहे. अॅमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.लिमा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. विमान अपघातात बारा प्रवासी आणि […]

Brazil Plane Crash

Brazil Plane Crash

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शनिवारी रात्री एका खासगी विमानाचा भीषण अपघात  (Brazil Plane Crash) झाला. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात बारसेलोस प्रांतात झाला. राजधानी मनाऊपासून हे ठिकाण 400 किलोमीटरवर आहे. अॅमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.लिमा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. विमान अपघातात बारा प्रवासी आणि दोन क्रू मेंबरच्या मृत्यूमुळे अतिव दुःख झालं. आवश्यक ती मदत देण्यासाठी आमची टीम मदत करत आहे. माझी सांत्वना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे त्यांनी म्हटले.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अमेरिकी प्रवाशांचाही समावेश आहे. मात्र, रॉयटरने यासंदर्भातील माहितीची खात्री केलेली नाही. मनाऊस एरोटॅक्सी एअरलाइन कंपनीनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताची माहितीही दिली. पण, अपघात नेमका कशामुळे घडला याच्या कारणाचा खुलासा कंपनीने केला नाही. तसेच या घटनेत किती मृत्यू झाले आणि किती प्रवासी जखमी झाले याचीही माहिती कंपनीने दिली नाही. दरम्यान, या घटनेचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version