दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी

PM Modi Bhutan Visit :  देशाची राजधानी दिल्ली येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा

PM Modi Bhutan Visit

PM Modi Bhutan Visit

PM Modi Bhutan Visit :  देशाची राजधानी दिल्ली येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्राना अलर्ट मोडवर असून सखोल तपास करत आहे.

तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आजपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहे. राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाल्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित दौरा कायम ठेवण्याने विरोधक पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आजपासून सुरु होणारा पंतप्रधान मोदी यांचा हा चौथा भूतान दौरा आहे. आजपासून पंतप्रधान भूतान दौऱ्यावर असून ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. या भेटीचा उद्देश भारत आणि भूतानमधील मैत्री आणि भागीदारी मजबूत करणे आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भूतान दौऱ्याची माहिती दिली.

या अधिकृत भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहतील आणि 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनतसांगचु-2 जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी भूतानला 10 अब्ज रुपयांची मदत देखील देतील आणि जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होतील, जिथे बुद्धांचे पवित्र पिप्राहवा अवशेष भारतातून भूतानमध्ये आणले गेले आहेत.

पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतील आणि एका जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही करतील. त्यानंतर ते त्यांच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहतील आणि जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतील. ते ऊर्जा, रेल्वे, रस्ते संपर्क आणि विकास प्रकल्पांवर चर्चा करतील. दोन्ही देश भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेतील सहकार्यावरही चर्चा करतील.

अहिल्यानगर पुणे मार्गावर गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

Exit mobile version