PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (13 जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी 4 वाजता पॅरिसला पोहोचतील. येथील ऑर्ली विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ( PM Modi leaves for France, will have dinner with President Macron)
फ्रान्समध्ये होणाऱ्या बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान मोदींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या भेटीच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 13 आणि 14 जुलै रोजी फ्रान्सला भेट देणार आहेत. पीएम मोदी गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजता सिनेटमध्ये पोहोचतील आणि सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर यांची भेट घेतील.
पंतप्रधान मोदींचे आजचे वेळापत्रक काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी 4 वाजता पॅरिसला पोहोचणार आहेत. संध्याकाळी सिनेटच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ते नऊच्या सुमारास फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. PM मोदी रात्री 11 वाजता ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाला संबोधित करतील. यानंतर पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचतील.
पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडला उपस्थित राहणार आहेत
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बुधवारी (12 जुलै) सांगितले की, पंतप्रधान मोदी गुरुवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचतील. ते म्हणाले, “पीएम मोदींच्या दौऱ्याचा मुख्य औपचारिक भाग 14 जुलैपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात – बॅस्टिल डे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
USA : अमेरिकेलाही पावसाचा फटका, ‘व्हरमाँट’ शहर पुराच्या विळख्यात
ते म्हणाले, “फ्रान्सने पंतप्रधान मोदींसाठी दाखवलेला हा विश्वास आहे. भारतीय वायुसेनेच्या तीन विमानांसह सशस्त्र दलांचा मोठा त्रि-सेवेचा तुकडा बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होणार आहे. बॅस्टिल डे समारंभाच्या शेवटी भारतीय हवाई दलाचे विमान फ्लायपास्ट करतील.
फ्रान्सनंतर पंतप्रधान मोदी यूएईला जाणार आहेत
फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून परत आलेले पंतप्रधान मोदी 15 जुलै रोजी अबुधाबीला भेट देतील, जिथे ते संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील. ऊर्जा, अन्न सुरक्षा, संरक्षण या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी चर्चा करणार.