Download App

पाकिस्तान सुधारणार नाही, PM मोदी यांच्या नाराजीचं कारण काय? चीन आणि ट्रम्प…

PM Modi On Relations With Pakistan And China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लेक्स फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये देशाच्या आणि जगाच्या सर्व मुद्द्यांवर विस्तृतपणे भाष्य केलंय. पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि अगदी अमेरिकेबद्दलही (America) मोदींनी त्यांचं मत व्यक्त केलंय. अमेरिका आणि चीनप्रमाणेच मोदींनीही पाकिस्तानशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिलंय. पाकिस्तानकडून नेहमीच विश्वासघात झाल्याचं मोदींनी नमूद केलंय. ते पाकिस्तानबद्दल अत्यंत निराश आहेत. तर चीनकडून मोदींना खूप आशा आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोदींना चांगलाच विश्वास आहे.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेबद्दलच्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांचाआणि भारत-चीन संबंधांबद्दल शी जिनपिंग यांचा उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसोबतच, मोदींनी (PM Modi Podcast) वैयक्तिक संबंधांशी संबंधित अनुभव देखील शेअर केलेत. मोदींनी ट्रम्प यांचे मनापासून कौतुक केलंय, पण अमेरिकन निवडणुकीदरम्यान झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

‘मंज़िलें अभी और भी हैं…’ शीतल म्हात्रे शिंदेंवर नाराज? विधान परिषदेची उमेदवारी चंद्रकांत रघुवंशींना

पंतप्रधान मोदींना वाटतं की, पाकिस्तान सुधारणार नाही. सध्या तरी पाकिस्तानात अराजकता आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्याबाबत मोदींनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याची आठवण करून दिली. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांसह पाकिस्तानलाही आमंत्रित केले होते आणि ते आलेही होते, परंतु काहीही बदल झाला नाही.

मोदींनी यापूर्वीही म्हटलंय की, पाकिस्तान राज्याबाहेरील घटकांद्वारे चालवला जात आहे. अशा परिस्थितीत आपण कोणाशी बोलायचे? जगात कुठेही दहशतवादी हल्ला होतो, त्याचे ट्रेस कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाकिस्तानकडे जातात… 9/11 हल्ल्याचे उदाहरण घ्या… मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन कुठून आला? त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला. एकंदरीत, पाकिस्तानसोबतच्या संबंधांबद्दल मोदी खूपच निराश आहेत, तर चीनसोबतच्या संबंधांबाबत सरकारच्या भूमिकेवरून पंतप्रधान मोदी अनेकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडतात.

औरंगजेबाची कबरीबाबत सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संरक्षण द्यावचं लागणार…

मोदींनी चीनसंदर्भात बोलताना म्हणाले की, भविष्यातही आमचे संबंध मजबूत राहतील. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर, आम्हाला सीमेवर सामान्य स्थिती परतताना दिसली आहे. आम्ही 2020 पूर्वीच्या पातळीवर परिस्थिती परत आणण्यासाठी काम करत आहोत. वेळ लागेल, पण आम्ही संवादासाठी वचनबद्ध आहोत. 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे.  भारत आणि चीनने स्वाभाविकपणे स्पर्धा करावी, संघर्ष नाही असं देखील मोदींनी स्पष्ट केलंय.

 

follow us