Download App

पंजाबचं तूप, गुजरातचं मीठ मोदींनी बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ वस्तू

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी 21 जूनला त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी अगोदर बायडेन दाम्पत्याने मोदींना तर नंतर मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तुंची सध्या चर्चा सुरू आहे. काय आहेत या भेटवस्तू आणि त्या मागील अर्थ जाणून घेऊ… (Pm Modi Us Visit Specialty of Gifts by Modi to Joe Biden First Lady Jill Biden)

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

मोदींनी बायडेन दाम्पत्याला कोण-कोणत्या भेटवस्तू दिल्या?

पीएम मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिलेल्या बॉक्समध्ये चांदीचा नारळ आहे, चंदनाची पेटी यामध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे सोन्याचे नाणे आहे. शिवाय या बॉक्समध्ये 99.5 टक्के शुद्धतेचे चांदीचे नाणे असून, लवणदानासाठी मीठ, तूप, गूळ, तांदूळ तीळ, दिवा अशा भेटवस्तू दिल्या आहेत.

या भेटवस्तुंची खासियत काय?

1 मोदींनी या भेटवस्तुंमध्ये दिलेलं चंदन हे कर्नाटकमधील म्हैसूर चंदनाचा तुकडा आहे.
2 दिवा चांदीचा कोलकात्याच्या कारागिरांनी तो बनवला आहे.
3 भगवान गणेशाची मूर्ती कोलकात्याच्या सोनारांच्या पाचव्या पिढीने बनवली आहे.
4 24 कॅरेट सोन्याचं नाण हे राजस्थानातील कारागिरांनी हाताने बनवलेलं आहे.
5 या भेटवस्तुंतील तूप हे पंजाबमधील आहे.
6 गूळ हा महाराष्ट्रातील आहे.
7 तांदूळ हे उत्तराखंडमधील आहेत.
8 मीठ हे गुजरातमधील आहे.
9 तर तीळ हे तामिळनाडूचे आहेत.
10 कोलकात्याच्याच कारागिरांनी बनवलेला चांदीचा नारळ आहे.

PM Modi America Tour : भर पावसात अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर; बायडन दाम्पत्याकडून व्हाईट हाऊसमध्ये स्वागत

मोदींनी बायडेन यांना दहा मोदींनी भेटवस्तू का दिल्या?

मोदींनी बायडेन यांना दहा मोदींनी भेटवस्तू दिल्या कारण सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे ज्याने एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत. याशिवाय 80 वर्षे 8 महिने पूर्ण झालेल्या व्यक्तीलाही ते दिले जाऊ शकते. ही भेट हिंदू परंपरेचा एक भाग आहे. हिंदू परंपरेत सहस्त्र पौर्णिमेला दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दान करण्याची परंपरा आहे. गौदान, भूदान, तिलदान, हिरण्यदान (सोने), अजयदान (तूप), धान्यदान (पीक), वस्त्रदान (कपडे), गुडदान, रौप्यदान (चांदी) आणि लवंडदान (मीठ) अशी परंपरा आहे.

बायडेन दाम्पत्याने मोदींना या भेटवस्तू दिल्या :

यावेळी बायडन दाम्पत्य आणि व्हाईट हाऊसकडून मोदींनाही खास भेटवस्तू दिल्या. या वस्तुंमध्ये 20 व्या शतकातील हाताने बनवलेली प्राचीन अमेरिकन बुक गॅलरी आहे. त्याचबरोबर विंटेज कॅमेरा, वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचे हार्डकव्हर पुस्तक तर यामध्ये आणखी खास म्हणजे फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या तर्फे रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कविता संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक भेट म्हणून दिले.

Tags

follow us