PM Narendra Modi Ukraine Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी युक्रेन दौऱ्यावर होते. भारत हा रशियाचा मित्र देश. त्यात रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू. अशा परिस्थितीत मित्र देशाच्या पंतप्रधानाने युक्रेनचा दौरा करावा आणि यावर रशियाची प्रतिक्रिया काय असेल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. रशियाने या दौऱ्यावर सावध प्रतिक्रिया दिली. मात्र मोदींनी युक्रेन दौरा का केला? यामागे काय कारण होते? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या..
पीएम मोदींचा युक्रेन दौरा (Ukraine War) जवळपास नऊ तासांचा होता. मोदी शुक्रवारी (23 ऑगस्ट) युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले. येथे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की यांनी त्यांचे स्वागत केले. युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाल्यानंतर तीस वर्षात युक्रेनचा दौरा केलेले मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. दोन्ही नेत्यांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
जयशंकर यांच्यानुसार भारताने युक्रेनला (India Ukraine) सध्याच्या जागतिक तेल बाजाराची सद्यस्थिती, त्याचा भारतावर होणार परिणाम, रशियाकडून तेल (Russia) खरेदीची भारताची गरज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा होणारा परिणाम या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती युक्रेनला दिली. पंतप्रधान मोदींनी झेलेंस्किंना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 1992 नंतर पहिल्यांदा युक्रेनचा दौरा केला. अशा प्रसंगी त्यांना भारत भेटीचे आमंत्रण देणे स्वाभाविक गोष्ट आहे जी मोदींनी केली असेही त्यांनी सांगितले.
‘भारत युक्रेन-रशिया युद्धाला थांबवू शकतो’ PM मोदींच्या भेटीनंतर पोलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं
या दौऱ्यात भारत रशिया ऊर्जा व्यापारावर चर्चा करण्यात आली. मी जास्त सविस्तर सांगू शकणार नाही पण ऊर्जा बाजाराची सध्याची परिस्थिती काय आहे हे युक्रेनला समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज ऊर्जा क्षेत्रातील अनेक उत्पादकांवर निर्बंध लादले गेले आहेत ज्यामुळे बाजाराची परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने तेलाच्या किमती स्थिर आणि योग्य राहणे गरजेचे आहे असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी स्पष्ट केले.
सध्या भारताला गल्फ आणि अन्य तेल निर्यातक देशांच्या तुलनेत रशियाकडून कमी किमतीत तेल मिळत आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) आधी भारत याच देशांकडून तेल खरेदी करत होता. पण युद्धानंतर परिस्थिती बदलली. आता जर भारताने जास्त दराने तेल खरेदी केले तर त्याचा परिणाम फक्त भारतावर नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही (World Economy) परिणाम होणार आहे. कारण भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारताने विदेशी व्यापार आणि तेल खात्याला संतुलित केले आहे.
Ukraine War : युक्रेन युद्धात तेल! रशियाच्या कट्टर शत्रूच्या हाती ‘नाटो’ची कमान
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने एक रिपोर्ट जारी केला आहे. यानुसार भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक देश आहे. भारताने जुलै महिन्यात रशियाकडून 2.8 बिलियन अमेरिकी डॉलर किमतीचे काच्चे तेल खरेदी केले होते. तेल खरेदीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे. रशिया भारतासाठी मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे. कच्च्या तेलाचं पुढे रिफायनरीध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्येर रुपांतर केलं जातं. फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवरील हल्ल्यानंतर काही युरोपीय देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. यानंतर रशियाने तेल खरेदीवर सवलत देण्यास सुरुवात केली. याचा फायदा भारताने घेतला. युद्धाआधी भारत रशियाकडून एक टक्काही तेल खरेदी करत नव्हता पण आज हेच प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.