Download App

मोदींना पायउतार करुन नितीन गडकरींना पंतप्रधान करा! किशोर तिवारींचं मोहन भागवत यांना खुलं पत्र

Kishor Tiwari Letter to Mohan Bhagwat : मोदींच्या (PM Modi) निवृत्तीची चर्चा पुन्हा तापली आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की, नेतृत्वाची जबाबदारी पुढच्या पिढीला द्यावी, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार होणार का? या चर्चांना जोर मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी थेट सरसंघचालकांना खुले पत्र (Nitin Gadkari) लिहिलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडवली (Narendra Modi Retirement) आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होत आहेत. संघाच्या (RSS) परंपरेनुसार वयोमर्यादेनंतर जबाबदाऱ्या बदलल्या जातात. त्यामुळे मोदींच्या भवितव्यावर चर्चा सुरू असताना तिवारी यांनी पत्रातून मोदींना सन्मानपूर्वक निवृत्त करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना देशाच्या नेतृत्वाची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

मुस्लिम मुलीच्या लग्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला धक्का

तिवारींचं पत्र आणि धक्कादायक दावे

पत्रात तिवारी म्हणतात, देशाने मोदींना 11 वर्षे पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी राममंदिरासह अनेक चांगली कामं केली. पण आता पुढच्या नेतृत्वाला संधी द्यावी. 2012 मध्ये काही नेत्यांच्या कटामुळे नितीन गडकरींची पंतप्रधान होण्याची संधी हिरावली गेली. मी स्वतः गडकरींना हे त्याचवेळी सांगितलं होतं. या कटामध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि प्रकाश जावडेकर सहभागी होते. पक्षशिस्तीमुळे गडकरी शांत राहिले, पण सत्य अजूनही जिवंत नेते जगासमोर मांडू शकतात.”

तिवारी यांनी मोदी-शहा जोडीवर थेट आरोप करताना म्हटलं आहे की, गेल्या 11 वर्षांत देशात विरोधकांची मुस्कटदाबी झाली आहे. हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवली जात आहे. यामुळे आता नेतृत्व बदलणं आवश्यक आहे.

‘पूप सूटकेस’! पुतिन यांच्या विष्ठेची रहस्यमय सफर, पोर्टेबल टॉयलेट ते ब्रीफकेसपर्यंत झेड प्लस सुरक्षा

गडकरींना का संधी द्यावी?

तिवारी यांनी गडकरींची प्रतिमा अधोरेखित करताना लिहिलं आहे की, गडकरी हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेता आहेत. त्यांची कार्यक्षम, विकासाभिमुख आणि सर्वमान्य अशी छबी आहे.
त्यांना उरलेल्या चार वर्षांसाठी पंतप्रधानपदी बसवून 2029 च्या निवडणुकीपूर्वी देशाला नवं नेतृत्व मिळावं.

पत्रात तिवारी यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा संघाशी असलेला संबंधही मांडला आहे. ते मागील 40 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. त्यांचे वडील पंडित जमुनाशंकर तिवारी गुरुजी 1962 पासून पूर्णवेळ प्रचारक होते. आणीबाणीच्या काळात नाशिक कारागृहातही कैदेत होते. राज्यात भाजप सरकार असताना त्यांना शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे अध्यक्षपद अन् राज्यमंत्री दर्जाही देण्यात आला होता, असंही तिवारी यांनी स्पष्ट केलं. .

मोदी-शाहांची लॉबी

तिवारी यांनी सांगितले की, 2019 मध्येही त्यांनी गडकरींना पंतप्रधान करण्याची उघड मागणी केली होती. मात्र, मोदी-शहा लॉबीने 292 जागा मिळवल्यानंतर मला भाजप सोडण्यास भाग पाडलं, असाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी पत्रातून केला. एकूणच, मोहन भागवतांना लिहिलेल्या या पत्रामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मोदींच्या 75 व्या वाढदिवशी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार का, आणि गडकरींना खरंच नेतृत्वाची संधी मिळणार का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 

follow us