Download App

OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला, महादेव जानकरांचे हाके-पडळकरांना सणसणीत प्रत्युत्तर

ओबीसांच्या हिताचा निर्णय घ्यायचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यांनी धनगर समाजासाठी अनेकदा पाठिंबा दर्शवला आहे

  • Written By: Last Updated:

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी जालन्यामध्ये (Jalna) माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या शरद पवारांवरील (Sharad Pawar) टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. हाके आणि पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर सातत्याने पवारांवर ‘धनगर समाजाविरोधी’ असल्याचे आरोप केले. यावर जानकर यांनी या दोघांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. तसंच ओबीसी समाजासाठी शरद पवारांचं योगदान असल्याचंही त्यांनी म्हटलं.

डेंग्यू ते मलेरिया… डास पसरवताहेत जीवघेणे आजार, जाणून घ्या डासांंपासुन संरक्षणाचे घरगुती उपाय 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढली जात आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधत नागपुरातून निघालेल्या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरमध्ये हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. दरम्यान, पवारांनी काढलेल्या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. मात्र, आता महादेव जानकरांनी पवारांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज जालन्यात दाखल झाली आहे. ओबीसींच्या हिताचे प्रश्न घेऊन ही यात्रा जात असल्यामुळं मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी स्वत: हजर झालो असल्याचं जाणकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

पवारांनी ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले..
तसंच ओबीसांच्या हिताचा निर्णय घ्यायचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यांनी धनगर समाजासाठी अनेकदा पाठिंबा दर्शवला आहे. अशा नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणे चुकीचे आहे. मात्र, आंब्याच्याच झाडाला माणसं दगडं मारतात, ज्याला फळ नसतं, त्याला कोणी दगडं मारत नाही, असं म्हणत ओबीसींच्या भूमिकेवरून पवारांवर टीका करणाऱ्यांना जानकरांनी चांगलाच टोला लगावला.

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, भोपाळ हादरलं 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले महादेव जानकर पुन्हा महायुतीची साध सोडली आहे. काही दिवसांपूर्वी ते ठाकरे बंधूंच्या वरळीतील मेळाव्यातही दिसून आले होते. ते राज्यातील महायुती सरकार आणि भाजपवर जोरदारपणे टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाणकर महाविकास आघाडीत सामील होतात का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वंचितकडून पवारांवर टीका
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही टीका करत गंभीर आरोप केले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता, तसंच श्रीमंत मराठा हा एनसीपीचा बेस आहे, असंही ते म्हणाले होते.

follow us