Download App

Video : पालिका निवडणुकांपूर्वी शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंसह राष्ट्रवादीला पाडलं भगदाड

एकनाथ शिंदेंनी कल्याण-डोंबिवलीमध्ये उबाठाला मोठा झटका दिलाय. शिंदेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत 3 माजी नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

  • Written By: Last Updated:

UBT leaders join ShivSena : स्थानिक स्वराज्य संस्था (local self-government) आणि महापालिका निवडणुकीआधी (Municipal elections) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला (UBT) मोठा झटका दिलाय. उपमु्ख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

251 खासदारांचे सदस्यत्व धोक्यात, नव्या विधेयकामुळे कोणत्या पक्षाला सर्वाधिक धोका ? 

कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जपत होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक आज शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आज सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

शरद पवारांना मोठा धक्का; माजी आमदार अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश 

ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनतेनं केलं…
शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. ८० जागा लढवून ६० जागा आम्ही जिंकलो. काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही पण आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होते तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली होती, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला लगावला.

मागील अडीच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिलं. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
तसेच अततिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने ४५००० कोटींची मदत केली होती, आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

follow us