Why russia is called indias best friend forever all you need to know in 5 points : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) तीस तासांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. पुतिन यांचा हा दौरा भारत आणि रशिया दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांचे सर्वोत्तम मित्र म्हणून जगभरात सर्वश्रृत आहेत. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) 2014 मध्ये पहिल्यांदा पुतिन यांना सांगितले होते की, भारतातील प्रत्येक मुलाला माहित आहे की, रशिया आमचा सर्वात चांगला मित्र आहे. पण, रशिया भारताचा फॉरएवर बेस्ट फ्रेंड का आहे? याबद्दल सोप्या पाच मुद्द्यांमध्ये समजून घेऊया…
छोट्याशा उंदारला घाबरले अन्…; पावरफुल पुतिन यांच्या कधीच जगासमोर न आलेल्या गोष्टी वाचल्या का?
रशिया भारताचा फॉरएवर मित्र का? कारण काय?
1. स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला सर्वात मोठा आधार
ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्यानंतर कोणत्याही महासत्तेच्या दबावापासून मुक्त राहणे हे भारताचे प्राथमिक प्राधान्य होते. त्यावेळी, अमेरिका ब्रिटनचा सर्वात जवळचा मित्र होता आणि भारताला नवीन वर्चस्वाची भीती वाटत होती. येथेच रशियाने (तेव्हाचे सोव्हिएत युनियन) भारताला धोरणात्मक जागा दिली. भारताने अलिप्ततेचे धोरण अवलंबले असल्याने, रशियाने भारताला त्याच्या परराष्ट्र धोरणासाठी मोकळी जागा दिली, त्याचा आदर केला आणि प्रत्येक पावलावर पाठिंबा दिला.
2. 1971 च्या युद्धात रशिया हा सर्वात मोठा मित्र
1971 च्या युद्धात रशिया-भारत मैत्रीची खरी परीक्षा झाली. पूर्व पाकिस्तानमध्ये (सध्याचा बांग्लादेश) अत्याचार वाढत असताना आणि भारत निर्वासितांचा फटका सहन करत होता. त्यावेळी सोव्हिएत युनियन भारताच्या पाठीशी उभा राहिला. अमेरिकेने पाकिस्तानच्या समर्थनार्थ बंगालच्या उपसागरात 7 वा नौदल पाठवला. सोव्हिएत नौदलाने भारतीय हितांचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप केला. या क्षणाने संकटाच्या वेळी रशियाने भारताचा मित्र म्हणून प्रतिमा कायमची मजबूत केली. 1962 च्या चीन युद्धात रशियाने भारताची बाजू घेतली नसली तरी, 1971 मध्ये रशियाने दिलेल्या पाठिंब्याने इतर सर्व गोष्टींवर सावली पडली.
3. भारतीय जनतेचा रशियावरील विश्वासाचा शिक्का
2023 च्या प्यू रिसर्च अहवालातून असे दिसून आले आहे की, भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य (57%) नागरिकांचे रशियाबद्दल सकारात्मक मत आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, सामान्य भारतीय अजूनही रशियाला एक विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण राष्ट्र मानतात. जरी भारताने रशिया-युक्रेन युद्धात औपचारिकपणे बाजू घेतलेली नसली तरी, जनमत रशियाच्या बाजूने पक्षपाती असल्याचे हा पाठिंबा देखील महत्त्वपूर्ण आहे.
‘पूप सूटकेस’! पुतिन यांच्या विष्ठेची रहस्यमय सफर, पोर्टेबल टॉयलेट ते ब्रीफकेसपर्यंत झेड प्लस सुरक्षा
4. रशियन शस्त्रे आणि लढाऊ विमाने, भारतीय हवाई दलाचा कणा
भारताच्या संरक्षण भागीदारीचा पाया रशियावर आहे. भारतीय हवाई दलाच्या जवळपास 29 प्रमुख लढाऊ विमानांमध्ये सुखोई-30, मिग-29 आणि मिग-21 यांचा समावेश आहे. रशिया जवळजवळ प्रत्येक लढाऊ क्षमतेत, ज्यामध्ये टँक, क्षेपणास्त्र प्रणाली, पाणबुड्या आणि हवाई संरक्षणात रशियाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
5. संयुक्त राष्ट्रात भारताला वाचवलं
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जेव्हा जेव्हा भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आला तेव्हा तेव्हा रशिया (तेव्हाचा सोव्हिएत युनियन) आघाडीवर होता. भारताला राजनैतिक संकटांपासून वाचवण्यासाठी रशियाने चार वेळा व्हेटो पॉवरचा वापर केला आहे. गोवा मुक्ती प्रकरण हे त्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.
Russia : वृद्ध महिलेचा सवाल अन् पुतिन निरुत्तर, थेट माफीच मागितली; रशियात काय घडलं ?
1961 मध्ये जेव्हा भारताने गोवा पोर्तुगालपासून मुक्त केला तेव्हा अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासह पाश्चात्य देशांनी भारतावर टीका करण्यास सुरुवात केली होती. तर, पोर्तुगालने संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाऊन भारतावर आपले सैन्य मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच वेळी, सोव्हिएत युनियनने आपला व्हेटो वापरुन स्पष्टपणे घोषित केले की, भारताची भूमिका पूर्णपणे न्याय्य आहेत. याशिवाय, काश्मीरशी संबंधित प्रस्तावांवर, दक्षिण आशियात तणाव निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला कोंडीत पकडू शकणाऱ्या मुद्द्यांवरही रशिया कायम भारताचे समर्थन करत आला आहे.
