Download App

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू पोलिस अधिकारी; राजेंद्र मेघवार यांनी रचला इतिहास

Rajender Meghwar Hindu pak police officer :मेघवार हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतमधील बदीन जिल्ह्यातील आहे. हा जिल्हा मागास म्हणून गणला जातो.

  • Written By: Last Updated:

Rajender Meghwar Hindu pak police officer : पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदू (Hindu) समाज अल्पसंख्याक आहे. या समाजावर पाकमध्ये अत्याचार केले जात असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. पण आता एक आनंदाची बातमी पाकमधून आली आहे. हिंदू समाजातील एक तरुण येथे पोलिस अधिकारी झाला आहे. या देशात पहिल्यांदाच हिंदू व्यक्ती पोलिस अधिकारी झाला आहे. राजेंद्र मेघवार (Rajender Meghwar) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

PM Vishwakarma Scheme : मोदी सरकारची सुपरहिट योजना, मिळणार 5% व्याजावर 3 लाखांचे कर्ज

मेघवार हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतमधील बदीन जिल्ह्यातील आहे. हा जिल्हा मागास म्हणून गणला जातो. मेघवार यांनी सिव्हिल सेवा परीक्षा पास केली आहे. त्यांना पोलिस अधिकारी बनविण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती फैसलाबादमधील गुलबर्ग येथे करण्यात आली असून, ते सहायक पोलिस अधीक्षक असणार आहेत. पोलिस विभागात नियुक्ती झाल्याने थेट लोकांच्या समस्या सोडण्याची संधी मला मिळणार आहे. मी हिंदू समाजासाठी चांगले काम करेल, असे मेघवार यांनी म्हटले आहे. त्यांच्याबरोबर एक हिंदू महिलाही सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाली असून, तिची नियुक्ती परराष्ट्र विभागात करण्यात आली आहे.

शरद पवार लई हुशार… गहिवर घालायला मारकडवाडीत; सदाभाऊ खोतांची तुफान फटकेबाजी


पाकिस्तानमध्ये केवळ दोन टक्के हिंदू

पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे. हा जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश आहे. या देशाची लोकसंख्या 24 कोटी आहे. त्यात दोन टक्के हिंदू समाज आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतमध्ये हिंदू समाज राहतो. पाकमध्ये राष्ट्रीय आणि प्रांतच्या विधानसभेत अल्पसंख्याक हिंदूसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सिंध प्रांतमध्ये जबरदस्तीने हिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. त्यामुळे 2016 मध्ये धर्मांतरण रोखणारा कायदा करण्यात आला आहे. परंतु कट्टरपंथियांच्या विरोधामुळे हा कायदा लागू झालेला नाही. पाकच्या लोकसभेत दहा जागा गैरमुस्लिम अल्पसंख्यकांसाठी राखीव आहे. या जागा वाढविण्याची मागणी अनेकदा झालेली आहे. या देशात 11 ऑगस्टला अल्पसंख्यांक दिवस साजरा केला जातो.

follow us