Donald Trump On Iran : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 48 तासात ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करा नाहीतर इराणला अत्यंत विनाशकारी परिणामांना तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता सहाव्या आठवड्यात दाखल झाला असून, अमेरिका, इस्त्रायल आणि इराणसह या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली असल्याने युद्ध कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असताना 48 तासानंतर मोठी कारवाई करणार असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आणि इराणच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांना टार्गेट करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणला करार करण्यास आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 10 दिवसांचा वेळ दिला होता, वेळ वेगानं संपत आहे. 48 तासांनंतर अमेरिका त्यांच्यावर कहर बनून हल्ला करेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे इराणचा असा दावा आहे की, ‘बुशेहर’ (Bushehr) अणुऊर्जा प्रकल्पाजवळील एका क्षेत्रावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि एक इमारत उद्ध्वस्त झाली.
शुक्रवारी अमेरिकेची दोन लढाऊ विमाने कोसळली होती. त्यातील एक विमान इराणच्या (Iran) हद्दीत कोसळले, ज्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, अमेरिकेचे दुसरे ‘A-10 Warthog’ हे लढाऊ विमान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ कोसळले, मात्र त्यातील वैमानिकाला सुखरूप वाचवण्यात यश आले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अशी घोषणा केली की, जर त्यांना आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकेल, “तेथील तेल ताब्यात घेऊ शकेल आणि त्यातून संपत्ती निर्माण करू शकेल.”
🚨 BREAKING
Iran has been given just 48 hours
After that, the world could witness
one of the most devastating airstrikes ever.No more warnings. No more delays.
The countdown has begun. pic.twitter.com/e947lsfvRJ— America Army (@AmericaSpoof) April 4, 2026
हे विधान त्यांनी इराणचे पूल आणि वीज प्रकल्प बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर, तसेच अमेरिकन लष्कराने “इराणमध्ये जे काही उरले आहे, ते नष्ट करण्याची सुरुवातही अद्याप केलेली नाही,” असे ठामपणे सांगितल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर केले आहे. ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अंतिम इशाऱ्याची मुख्य मागणी ही होती की, इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी अन्यथा, त्यांना त्यांच्या वीज प्रकल्पांवरील हल्ल्यांचा सामना करावा लागेल.
आज ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; नागपूरपासून नांदेडपर्यंत ‘अलर्ट’ जारी
त्यांनी असाही संकेत दिला की, हा संघर्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये व्यत्यय आणत असल्याने आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढवत असल्याने, ते इराणमधील लक्ष्यांच्या यादीचा विस्तार करतील आणि त्यामध्ये पुलांसारख्या नागरी पायाभूत सुविधांचाही समावेश करतील. दुसरीकडे, इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी मध्यपूर्वेतील आणखी एका महत्त्वपूर्ण जलमार्गाच्या संदर्भात अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. बाब अल-मंदेब सामुद्रधुनी ही अरबी द्वीपकल्पाच्या अगदी दक्षिणेकडील टोकावर वसलेली आहे. जगातील सुमारे एक चतुर्थांश कंटेनर-आधारित मालवाहतूक याच मार्गावरून सुएझ कालव्याकडे आणि तिथून परत केली जाते.
