Krasheninnikov Volcano erupts after 600 years in Russia : रशियातून एक धक्कादायक बातमी (Russia News) समोर आली आहे. येथे तब्बल 600 वर्षांनंतर एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. कामचटका बेटांवर स्थित हा ज्वालामुखी याआधी 1463 मध्ये बाहेर आला होता. त्यानंतर आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या ज्वालामुखीची उंची 1856 मीटर मापण्यात आली. रशियाची सरकारी न्यूज एजन्सी RIA नोवोस्ती आणि वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात तब्बल सहा हजार मीटरपर्यंत उंचावर राखेचे लोट पोहोचले होते. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी येथे 7.0 तीव्रतेचा भूकंप आला होता.
क्रशेनिनिकोव ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर या परिसरात राखेचे उंचच उंच लोट उठले होते. राखेचे ढग पॅसिफिक समुद्राच्या दिशेने निघून गेले. यामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने याला ऑरेंज विमानन कोड दिला आहे. याचा अर्थ असा की ही घटना हवाई वाहतुकीसाठी धोका ठरू शकते.
रशियाने घेतला युक्रेनचा धसका! प्रथमच घेतला ‘हा’ मोठा निर्णय; युद्धाच्या मैदानात काय घडतंय?
या उद्रेकाचा टायमिंग केवळ योगायोग वाटत नाही. वोल्केनोलॉजिस्ट ओल्गा गिरिना यांच्या मते हा स्फोट नुकत्याच झालेल्या भूकंपाशी संबंधित असू शकतो. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की फ्रेंच पोलिनेशिया आणि चिलीमध्ये त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा क्लुचेवस्कॉय ज्वालामुखी आहे. या भागात हाच ज्वालामुखी सर्वात सक्रिय आहे. यातही विस्फोट झाल्याची माहिती आहे.
WATCH: Incredible footage of the FIRST RECORDED ERUPTION of Krasheninnikov volcano in Kamchatka, Russia.
It wouldn’t be a surprise to me if it was triggered by the megathrust M8.8 earthquake a few days ago.
Krasheninnikov volcano began its FIRST RECORDED eruption at 16:50 UTC… pic.twitter.com/FpUKRo9dLG
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) August 3, 2025
वोल्केनोलॉजिस्ट ओल्गा गिरिना यांनी सांगितले की हा क्रशेनिनिकोव ज्वालामुखीचा पहिला स्फोट आहे. हा स्फोट अलीकडेच झालेल्या भुकंपाशी संबंधित असू शकतो. भूगर्भीय विज्ञानात असे मानले जाते की ज्यावेळी पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट हलतात त्यावेळी मॅग्मा चेंबर्समध्ये दबाव निर्माण होतो. यामुळे भुगर्भातील ज्वालामुखी सक्रिय होतात.
भूकंप आणि ज्वालामुखीच्या घडामोडी नेहमी बरोबरच घडत असतात. ज्या भागात टेक्टोनिक्स प्लेट्स जास्त सक्रिय असतात तिथे या घडामोडी घडत असतात. कामचटका बेट आहे या बेटाला Pacific Ring of Fire चा हिस्सा मानले जाते. जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी हा एक आहे.