PM Modi US Press Conference: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांनी तिखट प्रश्न विचारले होते. वरुन त्यांना सोशल मीडियात मोठे ट्रोल करण्यात आले होते. त्यांना ट्रोल केल्यावरुन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने कडक शब्दात निषेध केला आहे. विशेष म्हणजे याआधी या वृत्तपत्राने व्हाईट हाऊसला या घटनेची माहिती दिली होती. वृत्तपत्राने सांगितले होते की, आमच्या पत्रकाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला, तेव्हापासून भारतातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत.
या घटनेबाबत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या जॉन किर्बी म्हणाल्या की, अशाप्रकारे ट्रोल करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पत्रकाराच्या ट्रोलींगच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. दरम्यान, अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सबरीना सिद्दीकी यांनी मोदींना प्रश्न विचारला होता.
सबरीना सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना भारतातील अल्पसंख्याकांसोबत भेदभावावरुन प्रश्न विचारला होता. मात्र, त्याच दिवसापासून ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली होती. तिने विचारले होते की, भारत स्वत:ला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानतो पण तुमच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव केला आहे आणि टीका करणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे असा अनेक मानवाधिकार संगघटनांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या देशातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे अधिकार सुधारण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सरकार कोणती पावले उचलणार आहेत?
हिंडेनबर्गच्या भ्रामक रिपोर्टनंतर कंपनीची वाटचाल पहिल्यापेक्षा सुसाट : अदानी
उत्तरात, पंतप्रधानांनी या प्रश्नावर आश्चर्य व्यक्त केले आणि ते म्हणाले, ‘भारताच्या लोकशाही मूल्यांमध्ये कोणताही भेदभाव नाही. जात, पंथ, वय किंवा कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. ते पुढे म्हणाले, ‘भारत ही लोकशाही आहे. आणि अध्यक्ष बिडेन यांनी देखील सांगितले आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. लोकशाही हा आपला आत्मा आहे. लोकशाही आमच्या रक्तात धावते. आम्ही लोकशाही जगतो.
Virender Sehwag : सचिन प्रमाणे विराटला देखील टीमइंडियाने 2023 विश्वचषक जिंकून निरोप द्यावा!
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर सबरीना सिद्दीकीने शनिवारी भारतीय क्रिकेट संघाचा शर्ट घातलेले फोटो शेअर करत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ती आणि तिचे वडील भारताच्या 2011 क्रिकेट विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
Since some have chosen to make a point of my personal background, it feels only right to provide a fuller picture. Sometimes identities are more complex than they seem. pic.twitter.com/Huxbmm57q8
— Sabrina Siddiqui (@SabrinaSiddiqui) June 24, 2023