हिंडेनबर्गच्या भ्रामक रिपोर्टनंतर कंपनीची वाटचाल पहिल्यापेक्षा सुसाट : अदानी
Gautam Adani on Hindenburg : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता गौतम अदाणी यांनी कंपनीच्या वार्षिक अहवाल बैठकीमध्ये यांनी हिंडेनबर्गवर निशाणा साधला आहे. ( Gautam Adani Said Hindenburg target mislead to Adani group companies )
1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय
काय म्हणाले गौतम अदानी?
उद्योगपती गौतम अदानी हिंडेनबर्गवर म्हणाले की, अदानी समुहाच्या कंपन्यांचा आर्थिक वर्ष 2023 आर्थिक अहवाल हा हिंडेनबर्गने केलेले आरोप खोटे आहेत याचा पुरावा आहे. या कंपनीने हेतुपुरस्सरपणे चुकीची माहिती दिली. मात्र कंपनीचे बॅलन्स शीट, अॅसेट्स आणि ऑपरेटिंग कॅशफ्लो पहिल्यापेक्षा जास्त मजबुत झाले आहे. असं देखील यावेळी अदानी म्हणाले.
महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार, बीआरएसविरोधात आशिष देशमुखांनी थोपटले दंड…
पुढे ते असं देखील म्हणाले की, या कंपनीने हेतुपुरस्सरपणे चुकीची माहिती दिली. कारण त्यांना समुहाची बदनामी करायची होती. स्टॉकची किंमत जाणून बुजून घसरवून त्यातून त्यांना नफा कमवायचा होता. तसेच कंपनीया या अहवालामुळे काही प्रमाणात अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली मात्र त्यातून फार नुकसान झाले नाही. तसेच आम्ही एफपीओ लॉन्च करणार होतो मात्र आमच्या शेअरहोल्डर्ससाठी हितासाठी तो निर्णयही परत घेतला होता.
हिंडेनबर्ग रिसर्च नक्की काय आहे ?
हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हिंडनबर्ग रिसर्च ही आर्थिक संशोधन संस्था आहे. जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. त्यात त्यांचा मुख्य उद्देश हा मानवनिर्मित आपत्ती आणि आर्थिक अनियमितता तपासणे हा आहे. या कंपनीची स्थापना नॅथन अँडरसन यांनी केली असून अँडरसन हे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवीधर झालेत. अँडरसन यांनी आपल्या रिसर्च करिअरची सुरुवात FactSet Research Systems Inc. या डेटा कंपनीमधून केली. त्यापुर्वी ते इस्रायलमध्ये अॅम्ब्युलन्स चालवत होते.
हिंडेनबर्ग रिसर्चचा आजवरचा इतिहास
हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने एखादया कंपनीवर रिसर्च प्रकाशित केल्यानंतर पुढील कारवाईपूर्वीच अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हिंडनबर्गने 2020 पासून 30 कंपन्यांवर रिसर्च प्रकाशित केले आहेत आणि अहवाल प्रकाशित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या सर्व कंपनीचे शेअर्स सरासरी 15% नी घसरले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या सर्व कंपन्याचे पुढील सहा महिन्यांत सरासरी 26 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. 24 जानेवारी रोजी, हिंडेनबर्ग या यूएस-आधारित शॉर्ट सेलर कंपनीने अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनसारख्या गंभीर आरोपांसह अनेक आरोप करणारा अहवाल जारी केला. यानंतर श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांची घसरण झाली. ही घसरण त्यांना थेट 20व्या स्थानावरूनही खाली घेऊन आली.