1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय

1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय

LetsUpp | Govt.Schemes
शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना 2013 पासून राबविली जात आहे.

Jayant Patil: ‘रेशनकार्डच रद्द करुन धान्य न देण्याच्या धमक्या’; जयंत पाटलांचे गंभीर आरोप

योजनेसाठी प्रमुख अटी :
▪सर्वसाधारण अर्जदाराकडे 3 गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे 1.5 (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा.
▪अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक.
▪पक्षीगृहाचे बांधकाम आराखडयाप्रमाणे असावे.
▪अर्जदाराचे कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीला नसावे.

मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…

लाभाचे स्वरूप

प्रकल्पाची एकुण किमंत रु. 2 लाख, 25000/-
सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान
अनूसूचित जाती / अनूसूचित जमातीसाठी 75 टक्के अनुदान

आवश्यक कागदपत्रे :
▪ओळखपत्राची सत्यप्रत
▪7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
▪प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
▪जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
▪रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रत.
▪अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा)
▪रहिवासी दाखला

संपर्काचे ठिकाण : अर्जदार राहत असलेल्या भागातील पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube