मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…

मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…

IAS Officer Sunil Kendrekar’s Voluntary Retirement : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या या निर्णयाने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र औरंगाबाद खंडपीठाकडून केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्रेकरांनी स्वच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारु नये, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. मार्च 2024 पर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज स्वीकारु नयेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आयुक्तांचा कुत्रा गायब झाला अन् आख्खी पोलीस यंत्रणा कामाला; अथक परिश्रमानंतर शोधमोहिमेला यश

कोर्टाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीवर केंद्रेकरांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च 2024 पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात आली असेल तोपर्यंत अर्ज स्वीकारु नये, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

सुनिल केंद्रेकर यांनी आतापर्यंत विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि सध्या विभागीय आयुक्त पदावर काम करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली रद्द करण्यासाठी अख्खा बीड जिल्हा रस्त्यावर उतरला होता. राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांची गनना होते. मात्र अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक व्हीआरएस घेतल्याने त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube