आयुक्तांचा कुत्रा गायब झाला अन् आख्खी पोलीस यंत्रणा कामाला; अथक परिश्रमानंतर शोधमोहिमेला यश

आयुक्तांचा कुत्रा गायब झाला अन् आख्खी पोलीस यंत्रणा कामाला; अथक परिश्रमानंतर शोधमोहिमेला यश

मेरठ महापालिकेच्या आयुक्ता सेल्वा कुमारी जे. यांचा सायबेरियन हस्की जातीचा पाळीव कुत्रा शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. रविवारी (25 जून) सायंकाळी आयुक्तांच्या घरातून अचानक हा कुत्रा गायब झाला होता. कुत्रा बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या आयुक्तांनी पोलिसांसह शोध सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. सोमवारीही दिवसभर कुत्र्याच्या शोधासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. अखेरीस, सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या कुत्र्याचा शोध लागला. (Meerut Municipal Commissioner Selva Kumari J. The police have succeeded in finding his pet dog of Siberian husky breed)

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या आयुक्त सेल्वा कुमारी जे. यांचे सिव्हिल लाइन परिसरात घर आहे. रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता सेल्वा यांना त्यांचा पाळीव कुत्रा घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. कुत्रा बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. कुत्र्याचा शोध सुरू केला. सोशल मीडियावरुन कुत्रा गायब झाल्याचे कळविण्यात आले.पण रविवारी संध्याकाळपासून सोमवारी संध्याकाळपर्यंत अथक परिश्रम करूनही तो पोलिसांना सापडत नव्हता.

आजच थांबवा तुमच्या ‘या’ सवयी; नाहीतर आणखी वाढू शकते पोटाची चरबी

पोलीस कर्मचाऱ्यांनी फोटोंच्या मदतीने 500 हून अधिक घरांची झडती घेतली आणि शेकडो लोकांना फोटो दाखवून त्यांच्याबाबत विचारणा केली. अखेरीस सोशल मीडियावरील फोटो आणि माहिती पाहून एका व्यक्तीने स्वतः कुत्र्याला घेऊन आयुक्तांचे घर गाठले आणि कुत्रा चौकाचौकात फिरत असल्याचे सांगितले. “कमिशनरचा कुत्रा गायब झाला असून तो हस्की जातीचा असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कळताच आपण या कुत्र्याला ओळखले, असे या व्यक्तीने सांगितले.

Train: भारतातील ‘या’ रेल्वे ७० स्टेशन्स अन् १३ राज्यांतून मारतात फेरफटका

दरम्यान, कुत्रा परत मिळाल्याने आयुक्त सध्या जाम खूश आहेत. सायबेरियन हस्की जातीचा हा कुत्रा आयुक्तांनी गेल्या 2 वर्षांपासून पाळला आहे. त्याचे खाण-पान आणि आरोग्य यावर स्वतः आयुक्त नियमित लक्ष ठेवून असतात. दर महिन्याला डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले जाते. महापालिकेतही त्याची ऑनलाइन नोंदणी आहे. कुत्रा सापडल्याने आयुक्तांसोबतच पोलिसांचाही जीव भांड्यात पडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube