तेलापासून टेककडे, सौदी अरेबियाची गेमिंग क्षेत्रातील मोठी शैक्षणिक झेप, गेम डेव्हलपमेंटचा शालेय शिक्षणात समावेश

सौदी अरेबियाने एक धाडसी पाऊल उचलत गेम डेव्हलपमेंट आणि ई-स्पोर्ट्सचा समावेश थेट राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Untitled Design (25)

Untitled Design (25)

Saudi Arabia’s big educational leap in gaming : दशकानुदशके व्हिडिओ गेम्सकडे केवळ वेळ वाया घालवणारा विरंगुळा म्हणून पहिले जात होते. गृहपाठ सुरू होण्यापूर्वी बंद करायची गोष्ट, नियंत्रणात ठेवायची सवय, एवढ्यापुरतीच त्यांची ओळख मर्यादित होती. मात्र आता चित्र पालटत आहे. सौदी अरेबियाने एक धाडसी पाऊल उचलत गेम डेव्हलपमेंट आणि ई-स्पोर्ट्सचा समावेश थेट राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही योजना विद्यार्थ्यांना फक्त फोर्टनाईट सारखे गेम्स खेळू देण्याबद्दल नाही. उलट हे गेम्स कसे तयार होतात, त्यामागे कोणती कोडिंग प्रक्रिया असते, कथा कशा बांधल्या जातात, अ‍ॅनिमेशन आणि डिझाईन लॉजिक कसे कार्य करते, डिजिटल सहकार्य कसे घडते या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी आपल्या आवडत्या गेम्सच्या पडद्यामागील यंत्रणा समजून घेतील. आभासी विश्वांची निर्मिती कशी होते, कथानकाची रचना कशी होते आणि ई-स्पोर्ट्सची स्पर्धात्मक रचना कशी कार्यरत असते याचा अभ्यास करतील.

हा निर्णय सौदी अरेबियातील व्यापक आर्थिक रूपांतरण धोरणाशी सुसंगत आहे. तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांत विस्ताराची आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था उभी राहावी, या उद्दिष्टाने देशाने गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. पायाभूत सुविधा, स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्याद्वारे या क्षेत्राला चालना देण्यात आली आहे. शालेय स्तरावर गेमिंगचा समावेश करणे म्हणजे स्थानिक प्रतिमेला लवकर वयातच घडण्याची आणि डिजिटल निर्मात्यांची नवी पिढी तयार करण्याची दुर्गकालीन रणनीती स्पष्ट होते.

फक्त गेम खेळणे नव्हे, तर गेम तयार करणे, हा या बदलाचा गाभा आहे. विद्यार्थ्यांना केवळ ई-स्पोर्ट्स स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिले जाणार नाही, तर त्यांना प्रोग्रामिंग भाषा, गेम इंजिन्स, यूजर एक्सपीरिअन्स डिझाईन, कृत्रिम बुद्धिमत्ता तत्वे, डिजिटल कला आणि संघभावनेवर आधारित प्रकल्प यांचे शिक्षण दिले जाईल.

गेम डेव्हलपमेंट ही अनेक शाखांची सांगड घालणारी प्रक्रिया आहे. गणित आणि भौतिकशास्त्र गेमच्या यांत्रिकीला बळ देतात, सर्जनशील लेखन, कथानक आणि पात्रांना आकार देते. दृश्यकला गेमची ओळख घडवते, कोडिंग कल्पनांना संवादात्मक प्रणालीत रूपांतरित करते. तर रणनीती आणि मानसशास्त्र ई-स्पोर्ट्स स्पर्धांचा पाया घालतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित तसेच सर्जनशील कला. या दोन्हींच्या संगमावर गेमिंग उभे आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेला ज्या कौशल्यांची गरज आहे, ती यामध्ये एकत्रित दिसतात.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय; चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरतीची घोषणा

या उपक्रमाचे समर्थन करणाऱ्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, गेम डिझाईनचे संरचीत शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, प्रणालीक विचारसरणी आणि संघभावना विकसित करते. एक खेळण्यायोग्य गेम तयार करण्यासाठी सातत्याने सुधारणा, त्रुटी शोधणे, सहकार्य आणि चिकाटी अधायक असते. ही कौशल्ये जीवनातील इतर क्षेत्रांतही तितकीच महत्वाची आहेत.

जागतिक स्तरावर देखील गेमिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. दक्षिण कोरिया, जो ई-स्पोर्ट्स क्षेत्रात आघाडीवर आहे, तिथे स्पर्धात्मक गेमिंगला युवक विकास कार्यक्रम आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांशी जोडण्यात आले आहे. अमेरिका आणि कॅनडामधील हजारो शाळांमध्ये ई-स्पोर्ट्स संघ पारंपरिक क्रीडा संघांसारखेच चालवले जातात. काही ठिकाणी गेम डिझाईन, प्रसारण, इव्हेन्ट मॅनेजमेंट आणि डिजिटल नागरिकत्व यासंबंधी अभ्यासक्रमही सुरू आहेत.

युरोपमधील नॉर्डिक देश आणि ब्रिटनमध्ये ई-स्पोर्ट्सचा वापर संघभावना आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी केला जातो. विद्यापीठे ई-स्पोर्ट्स व्यवस्थापन आणि इंटरॅक्टिव्ह मीडियामध्ये पदवी अभ्यासक्रम देत आहेत. चीनमध्ये या क्षेत्राच्या रोजगारक्षमतेचा विचार करून व्यावसायिक शिक्षणमार्ग विकसित झाले आहेत. मध्यपूर्वेतही युएई आणि कतारमध्ये ई-स्पोर्ट्स अकादमी आणि शालेय स्पर्धा झुरू झाल्या आहेत. मात्र सौदी अरेबियाचा निर्णय वेगळा ठरतो कारण हा उपक्रम केवळ उपक्रमापुरता मर्यादित नसून थेट अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. याचा संदेश स्पष्ट आहे की, गेमिंग ही मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग आहे.

निश्चितच, या निर्णयावर टीकाही होत आहे. वाढत्या स्क्रीन टाइमबद्दल चिंता व्यक्त केली जाते. पालकांना शाळेत गेमिंग शिकवले जाणे हे पटणे कठीण जाऊ शकते. मात्र समर्थकांचे मत वेगळे आहे. त्यांच्यानुसार प्रश्न स्क्रीन टाइमचा नसून स्क्रीनचा उद्देश काय आहे, हा आहे. नुसते स्क्रोलिंग आणि गेम डेव्हलपमेंट यात फरक आहे. गेम कोड करणे, डिझाईन तयार करणे किंवा ई-स्पोर्ट्स रणनीतीची विश्लेषण करणे ही सक्रिय, सर्जनशील आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रश्न असा उरतो की, विद्यार्थी स्क्रीनसमोर किती वेळ घालवतात, यापेक्षा ते त्या वेळेत काय निर्माण करतात?

जलद नफ्याच्या अमिषामागे फसवणुकीचा डाव? अजित पवारांच्या नावाचा वापर करून नवा स्कॅम

जागतिक गेमिंग उद्योगाचा महसूल आज चित्रपट आणि संगीत उद्योगांच्या एकत्रित उत्पन्नापेक्षा अधिक आहे. करिअरच्या संधी केवळ व्यावसायिक खेळाडूपर्यंत मर्यादित नाहीत. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, 3D मॉडेलिंग, कथालेखन, ध्वनी डिझाईन, सायबरसुरक्षा, मार्केटिंग, डेटा विश्लेषण आणि इव्हेंट प्रोडक्शन अर्धा अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत.

लहान वयात गेम डेव्हलपमेंटचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक कल्पनाशक्तीचा विस्तार होतो. स्वतःला तांत्रिक समजत नसलेले विद्यार्थी कथालेखन किंवा कलेतून या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, तर काहींना प्रोग्रॅमिंगची गोडी गेमिंगमुळे लागेल. डिजिटल साक्षरता आज मूलभूत कौशल्य बनत असताना वर्गखोली देखील बदलत आहे. कोडिंग केवळ संगणक प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सर्जनशीलता फक्त वहीत अडकलेली नाही. आणि गेम्स आता केवळ खेळ राहिलेले नाहीत.

डिजिटल साक्षरता आज मूलभूत कौशल्य बनत असताना वर्गखोलीही बदलत आहे. कोडिंग केवळ संगणक प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सर्जनशीलता फक्त वहीत अडकलेली नाही. आणि गेम्स आता केवळ खेळ राहिलेले नाहीत. सौदी अरेबियाच्या अबीसक्रम सुधारणेचा संदेश व्यापक आहे, तरुण पिढीला आकार देणाऱ्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ती सकारात्मकपणे आत्मसात करावी लागेल. विसाव्या शतकातील वर्गखोलीने विद्यार्थ्यांना कारखाने आणि कार्यालयांसाठी तय्यार केले. एकविसाव्या शतकातील वर्गखोली त्यांना आभासी विधवांसाठी आणि त्यामागील वास्तव अर्थव्यवस्थेसाठी सज्ज करत आहे.

Exit mobile version