सौदी अरेबियामध्ये जाऊनही ट्रम्प यांचे तेच तुणतुणे…मीच युद्ध थांबवलं…

सौदी अरेबियामध्ये जाऊनही ट्रम्प यांचे तेच तुणतुणे…मीच युद्ध थांबवलं…

Donald Trump On India Pakistan Ceasefire In Saudi Arabia Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. काल सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मी व्यवसायाचा वापर केला. मी भारत आणि पाकिस्तानला सांगितले, अणु क्षेपणास्त्रांचा (India Pakistan Ceasefire) व्यापार करू नका. याअगोदर देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय स्वतःला दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी दोन्ही देशांना समजावून सांगितले की, जर लढाई थांबवली नाही तर आपण व्यापार करणार नाही.

सौदी अरेबियामध्ये जाऊनही ट्रम्प यांचे तेच तुणतुणे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक युद्धबंदी (Ind Pak War) ही अमेरिकेमुळेच झाली आहे. अमेरिकेने आयोजित केलेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी त्यांच्या बुद्धीचा आणि समजुतीचा वापर केल्याबद्दल अभिनंदन, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियात गेल्यानंतर देखील सांगितलं आहे.

PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव; ‘त्या’ दोन घटनांनी चित्रच पालटलं

काल 13 मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प द्विपक्षीय दौऱ्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचले. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत अब्जाधीश एलोन मस्क यांच्यासह अमेरिकन व्यावसायिक नेते देखील सौदी अरेबियात आहेत. अमेरिका आणि सौदी अरेबियाने इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार केला, तो जवळजवळ $142 अब्ज किमतीचा आहे, असं करार झाल्यानंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटलंय.

चांगल्या अन् वाईट काळात…पाकिस्तान, तुर्की दोस्ती जिंदाबाद! तुर्कीचा पुन्हा उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रियाध भेटीदरम्यान सौदी अरेबियासोबत एक ऐतिहासिक करार केला आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाने सुमारे 142 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार केला आहे. व्हाईट हाऊसने याला इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार म्हणून वर्णन केले आहे. या अंतर्गत सौदी अरेबियाला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जातील, असं देखील व्हाईट हाऊसने स्पष्ट केलंय.

या संरक्षण करारात लष्करी प्रणाली, शस्त्रे आणि सेवांचा समावेश आहे. याशिवाय करारामध्ये इतर व्यावसायिक करार, गॅस टर्बाइनची निर्यात यांचाही समावेश आहे. यानंतर ट्रम्प कतार आणि संयुक्त अरब अमिरातीचाही दौरा करणार आहेत. ट्रम्प यांचा मध्य पूर्व दौरा प्रामुख्याने आर्थिक मुद्द्द्यांवर केंद्रित आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढविण्यासाठी आखाती देशांकडून इतर प्रमुख करार होण्याची आशा अमेरिकन अध्यक्षांना आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube