Download App

धगधगते पाक : माजी विदेश मंत्रीही अटकेत; तीन प्रांतांमध्ये लष्कर

  • Written By: Last Updated:

Shah Mahmood Qureshi Arrested: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर सैनिकांवर हल्ले झाले आहेत. या हिंसाचाराला इम्रान खान यांचे निकटवर्तीय व माजी विदेश मंत्री शाह महमूह कुरेशी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. कुरेशी यांनी गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे.

Video : ‘दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा’; न्यायालयाच्या निकालावर अजितदादांची मिश्कील प्रतिक्रिया

पाकमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. देशाची राजधानी इस्लामाबादसह तीन प्रांतात सैनिक पाचारण करण्यात आलेले आहे. कुरेशी यांच्या अटकेचा एक व्हिडिओ तहरीक ए इन्साफ (पीटीआय) ने आपल्या ट्वीटरवर टाकला आहे.

माझ्या लिहिण्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं; ठाकरेंच्या राजीनाम्यावर पवारांची प्रतिक्रिया

कुरैशी यांना साध्या कपड्यातील काही लोक एका वाहनातून घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. ६६ वर्षीय कुरैशी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक करून एका अज्ञातस्थळी नेले आहे.

दोन दिवसांपूर्वी अर्धसैनिक दलाने माजी पंतप्रधान इम्रान खानला अटक केली आहे. इम्रान खान यांना आठ दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.

इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाल्यानंतर पाकमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. आतापर्यंत आठ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी रात्री आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये तीनशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. राजधानी इस्मानाबादनंतर पंजाब, खैबर, पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान या प्रांतांमध्ये लष्कर तैनात करण्यात आला आहे.

Tags

follow us