माझ्या लिहिण्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं; ठाकरेंच्या राजीनाम्यावर पवारांची प्रतिक्रिया
Shard Pawar On Uddhav Thackeray Resign : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील उपस्थित होते.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ
हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले आहे. त्यावर आता शरद पवारांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. माझ्या पुस्तकात मी ते लिहले आहे, असे ते म्हणाले. तसेच सध्या माझ एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यात हा विषय स्पष्ट आहे. माझ्या स्पष्ट म्हटल्याने आमचे काही मित्र नाराज देखील झाले होते. पण माझा नाराज करण्याचा हेतू नव्हता, ती वस्तुस्थिती होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने आज शिक्कामोर्तब केले असल्याचे पवार म्हणाले आहेत. त्यामुळे झालं ते झालं. आता आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस जोमाने काम करायला सुरुवात करु, असे पवार म्हणाले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार थोड्या दिवसांचं; सर्वोच्च निकालानंतर अनिल परबांनी सांगितली रणनीती
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर दोघांनी एकत्रितपणे पत्रकार परिषेदला संबोधित केले आहे. सध्या देशात सत्तेचा गैरवापर होत असल्यानं जयंत पाटलांना नोटीस आली आहे. काही निर्णय व्हायचे आहेत, असं मला वाटतं. विधानसभा अध्यक्षांनी नियमांच्या चौकटीत राहून काम करायचं असतं, असेही ते म्हणाले. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यावर बोलताना आम्ही एकत्र काम करु चेहरा नंतर ठरवू, असे ते म्हणाले.